शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:12 IST

पान १ वर मस्ट फोटो पी २९ यशोमती ठाकूर अमरावती : राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या ...

पान १ वर मस्ट

फोटो पी २९ यशोमती ठाकूर

अमरावती : राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा आयोगात किती उमेदवारांना अपात्र व्हावे लागले आहे हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्वरित विनंती करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यासंदर्भात अनाथ विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

अनाथ आरक्षणामध्ये अ वर्ग प्रमाणपत्रमधील ज्यांचे नातेवाईक नाहीत आणि ज्यांच्या जातीचा उल्लेख नाही अशांचा समावेश आहे. प्रमाणपत्र ब मध्ये ज्यांचे नातेवाईक नाहीत मात्र त्यांच्या जातीचा उल्लेख आहे आणि ज्यांचा सांभाळ संस्थेने केला आहे अशांचा समावेश आहे तर प्रमाणपत्र क दर्जामध्ये ज्यांचे आई-वडील नाहीत मात्र नातेवाइकांनी सांभाळ केला आहे अशा अनाथ बालकांचा समावेश होतो यापैकी अ आणि ब यांना राज्यसेवा आयोगाने पात्र ठरवले असले तरी क दर्जा असलेल्यांना मात्र पात्र ठरवले नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे क दर्जा असलेल्या उमेदवारांना अनाथ प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांना भविष्यासाठी नोकरीत संधी मिळावी यासाठी शासन निर्णयामध्ये बदल करण्याची गरज असून अशा पद्धतीचा प्रस्ताव महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून दिल्याचा यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच या संदर्भामध्ये नवीन निर्णय जाहीर करण्यात येऊन अशा अनाथ विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा नोकरीचा प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना संधी निर्माण होणार आहे.