शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण, हॉकर्स अन् वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवावी. या झोननिहाय पथकात चार पोलीस शिपाई, एक सहायक पोलीस निरीक्षक असावेत, असे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिकेत बैठक : आता झोननिहाय कारवाईचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनिर्बंध वाहतूक, रस्त्यावरच ठाण मांडणारे हॉकर्स, ठिकठिकाणी होत असलेले अतिक्रमण याबाबत महापालिकेत महापौर कक्षात मंगळवारी बैठक घेण्यात आली. या सर्व प्रकारात आता कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश महापौर व आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आता झोननिहाय कारवाई केली जाणार आहे.बैठकीला उपमहापौर कुसुम साहू, स्थायीचे सभापती बाळासाहेब भुयार, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवावी. या झोननिहाय पथकात चार पोलीस शिपाई, एक सहायक पोलीस निरीक्षक असावेत, असे ठरविण्यात आले. अनधिकृत इमारतप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच वेळोवेळी पुरविण्यात आलेल्या सुरक्षा पथकात बदल करण्यात यावा. शहरात आठ ठिकाणी जागा निश्चित करुन आठवडी बाजार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिकवणी वर्ग व शहरातील पार्किंगबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अवैध होर्डिंगबाबत कारवाई गतिमान करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.सेवाभावी संस्थेच्या मदतीने स्मशानभूमी विकाससेवाभावी संस्थेला सोबत घेऊन शहरातील स्मशानभूमी विकसित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मार्च महिन्याच्या आमसभेत याविषयी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. महानगरपालिका परिसरात पार्किंगची व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण