शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याला विम्याचे कवच

By admin | Updated: December 8, 2015 00:12 IST

राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा राज्यात अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा ..

फळपीक विमा योजना : केळी, मोसंबीचा समावेश, १० डिसेंबर अंतिम मुदतअमरावती : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा राज्यात अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने ३ डिसेंबरला घेतला. अमरावती जिल्ह्यात संत्रा, केळी व मोसंबी या फळपिकांचा समावेश योजनेत करण्यात आलेला आहे. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांमधील ७० महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येणार आहे. शेतकरी सभासदांना योजनेत सहभागी होण्यासाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमा योजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपिकांना निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा योजनेचा उद्देश आहे. सन २०१५-१६ मध्ये आंबिया बहर हंगामामध्ये फळपिकांसाठी विमा संरक्षण देय राहणार आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसूचित फळपिकासाठी पीककर्ज मर्यादा मंजूर आहे, अशा सर्व कर्जदारांनी ही योजना सक्तीची आहे. मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकासाठी किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादन क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येणार आहे. फळपिकासाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान राहणार आहे. संत्रा पिकासाठी अमरावती तालुक्यात अमरावती, वडाळी, बडनेरा, नवसारी, डवरगाव, माहुली जहागीर, नांदगाव या महसूल मंडळात भातकुली तालुक्यात निंभा महसूल मंडळात, धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव, चिंचोली, भातकुली, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर, दत्तापूर व तळेगाव दशासर या मंडळांत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदगाव खंडेश्वर, दाभा, शिवणी, रसुलापूर, मंगरुळ चव्हाळा, पापळ, लोणी, धानोरा गुरव, माहुली चोर या मंडळामध्ये मोर्शी तालुक्यात अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, धामणगाव (काटपूर), नेरपिंगळाई, शिरखेड, मोर्शी या मंडळात तसेच वरूड तालुक्यात वरूड, बेनोडा, पुसला, वाठोडा, लोणी, शेंदूरजनाघाट, राजुराबाजार या महसूल मंडळांत. तिवसा तालुक्यात तिवसा, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, वरखेड या मंडळांत. चांदूरबजार तालुक्यात चांदूरबाजार, ब्राह्मणवाडा थडी, बेलोरा, करजगाव, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना तर अचलपूर तालुक्यात अचलपूर, रासेगाव, असदपूर, परसापूर, पथ्रोट, परतवाडा. चिखलदरा तालुक्यात चिखलदरा, सेमाडोह, टेंभूरसोंडा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात अंजनगाव, भंडारज, विहिगाव, सातेगाव, कापूसतळणी, कोकर्डा या महसूल मंडळांचा योजनेत समावेश आहे. शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)