शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनजागेवरील मूर्ती हटविण्याचे निर्देश

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली.

आठवडाभराचा अल्टिमेटम् : सीसीएफ, डीएफओंची घटनास्थळी भेटअमरावती : येथील राज्य राखीव सुरक्षा दल वसाहती (५०० क्वॉटर्स) च्या मागील बाजूस वनविभागाच्या टेकडीवर निर्माणाधीन अतिक्रमित धार्मिक स्थळांची वनाधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. अतिक्रमणधारकांना मूर्ती व अन्य वस्तू त्वरेने हटविण्याचे निर्देश देण्यात आलेत.मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी वनाधिकाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमित धार्मिक स्थळी पोहोचला. या स्थळी बुध्दविहारस तयार करण्यात आले असून येथे पंचशील ध्वज उभारण्यात आला आहे. याच परिसरात नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्त्वात वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. येथे उपस्थित भन्ते संघपाल आदी कार्यकर्त्यांना हे अतिक्रमण हटविण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. आठवड्याच्या आत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण न हटविल्यास वनविभाग हे अतिक्रमण काढून घेणार, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा निर्मितीचे सुरु असलेले कार्य वनाधिकाऱ्यांनी बंद पाडले. हे अतिक्रमण दीड ते दोन वर्षांपासून असताना ते आतापर्यंत वनविभागाने का हटविले नाही, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. वनविभागाच्या टेकडीवरील दर्शनी भागात हे धार्मिक अतिक्रमण केले जात असताना जबाबदार वनाधिकाऱ्यांनी ते काढण्याची कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या नेतृत्त्वात वनविभागाने अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता कायदा व सुव्यस्थेमुळे ते हटविता आले नाही. आठ दिवसांत अतिक्रमण काढूअमरावती : मात्र, आता वनविभागाने टेकडीवरील अतिक्रमण हटविण्याची रणनिती आखली आहे. पुढच्या आठ दिवसात ते पोलीस बंदोबस्तात हटविले जाईल, अशी माहिती आहे. या परिसरात तीन ते चार वर्षांपासून गौतम बुध्दाची मूर्ती बसविण्यात आली आहे, हे विशेष. कारवाई दरम्यान घटनास्थळी अमोल इंगळे, भन्ते संघपाल, मनोज थोरात, सुनील राऊत, विश्वास वानखडे, अनिल फुलझेले, आशिष डोंगरे, मनोज वानखडे, विश्वास भालेराव आदी उपस्थित होते. दरम्यान साकारत असलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा त्वरित हटविला जाईल, असे आश्वासन वन विभागाला अतिक्रमणधारकांनी दिले.