साऊर व टाकरखेडा संभु येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:10+5:302021-07-21T04:11:10+5:30
रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातकुली तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच टाकरखेडा व साऊर येतील शेतीचे नुकसान झाल्याने काँग्रेस ...

साऊर व टाकरखेडा संभु येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातकुली तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच टाकरखेडा व साऊर येतील शेतीचे नुकसान झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याची पाहणी केली याबाबत पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे,
१८ जुलै रोजी ढगफुटी सदृश अतिपावसाने भातकुली तालुक्यातील शेती, जनावरांचा चारा,गावातील घरे,अन्न धान्य इत्यादीचे अतोनात नुकसान झाले,इतकेच नव्हे तर ग्रामीण रस्ते व शेतीचे रस्ते सुद्दा खरडून गेले.
सदर बाबतीत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.यशोमतीताई ठाकुर यांनी दिले होते, त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी फुलझेले साहेब, तहसीलदार निता लबडे, तालुका कृषी अधिकारी मुक्ता कोकाटे, विद्युत विभाग, पंचायत विभागाचे अधिकारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकद्दर पठाण,माजी सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड यांनी संयुक्त पाहणी दौरा केला , यावेळी डॉ रामदास रहाटे, रमेश बोंडे, दिलीप चव्हाण सरपंच साऊर, प्रदीप गौरखेडे ग्रामपंचायत सदस्य, चंदुभाऊ बोंडे पोलीस पाटील, अगाज पठाण,उमेश वाकोडे, रश्मीताई देशमुख सरपंच टाकरखेडा, दिलीप म्हसके, दिपक करडे, रामराम गुल्हाने,अरविंद भागवत, वैकुंठ देशमुख, अविनाश तायडे, सय्यद मुमताज, ,संबंधित ग्रामसेवक, नवरंगे , टाकरखेडा संभु चे ग्रामसेवक अनिल चांदुरकर , मनोज भेले तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.