शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी मशिनरीज नादुरुस्त, रुग्ण वाऱ्यावर

By admin | Updated: June 25, 2015 00:12 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय हे आरोग्याच्या दृष्टीने गोरगरिबांचा आधार समजले जाते.

इर्विनचा बेताल कारभार : बाहेरून रक्त तपासणीचा डॉक्टरांचा सल्लाइंदल चव्हाण अमरावतीजिल्हा सामान्य रुग्णालय हे आरोग्याच्या दृष्टीने गोरगरिबांचा आधार समजले जाते. येथे विविध आजारांची तपासणी करणाऱ्या मशिनरीज उपलब्ध आहेत. मात्र, त्या नादुरुस्त असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना तपासणीकरिता बाहेर जाण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हाभरातील क्रिटिकल आजारांनी बाधित गोरगरीब रुग्ण योग्य उपचाराच्या आशेने जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. त्यामुळे येथे रुग्णांची प्रत्येक वॉर्डात गर्दीदेखील असते. त्या दृष्टीने येथे विभागवार उपचाराची सोयसुद्धा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर शासनाकडून कोट्यवधींचा निधीदेखील दरवर्षी प्राप्त होतो. मात्र येथील रुग्णांना रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, किडनी तपासणी, सीटी स्कॅनसाठी इतर ठिकाणी स्वखर्चाने करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यासाठी रुग्णांना इतर ठिकाणी आजारपणात ने-आण करताना त्रास सहन करावा लागतो. गोरगरीब रुग्ण हा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे साधारण आजारांकडे दुर्लक्ष होऊन रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या रूग्णांच्या नातलगांच्या तक्रारी आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.