रेल्वे डब्यातील ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:37+5:30

अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मुख्यालयाने घेतली आहे. याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याबाबत वरिष्ठांनी कळविले आहे.

Inquiry into 'that' case in Railway Train | रेल्वे डब्यातील ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

रेल्वे डब्यातील ‘त्या’ प्रकरणाची चौकशी

ठळक मुद्देस्टेशन उपप्रबंधक, आरपीएफचे बयाण : पाच कंत्राटी, दोन रेल्वे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुंबईकडे जाणाऱ्या अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात चक्क मद्यपान केल्याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी प्रारंभ झाली आहे. अमरावती रेल्वे स्थानकाचे उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बलाने या ‘तळीराम’ कर्मचाऱ्यांचे गुरुवारी बयाण नोंदविले. या प्रकरणात पाच कंत्राटी कर्मचारी, तर दोन रेल्वे कर्मचारी अडकल्याची माहिती पुढे आली आहे.
‘लोकमत’ने गुरुवारी ‘अंबा एक्स्प्रेसमध्ये तळीरामांचा धिंगाणा’ या आशयाचे वृत प्रकाशित केले. त्यानंतर सकाळपासून एकूणच रेल्वे यंत्रणा जागी झाली. प्रकाशित झालेल्या बातमीसह छायाचित्राचा आधार घेत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक भाकर यांनी १६ सप्टेंबर २०१९ रोजी अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डबा क्रमांक बी १ मध्ये कर्तव्यावर असणारे तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. नेमकी घटना कोणत्या स्थळाची आहे, याचा शोध स्टेशन उपप्रबंधक, आरपीएफने चालविला आहे. अंबा एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना बेडशीट, चादर, उशी, ब्लँकेट आदी र् सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई येथील श्रेया एन्टरप्रायजेस या कंत्राटदाराकडे सोपविली आहे. अमरावती ते मुंबई दरम्यान अंबा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. १६ सप्टेंबर रोजी एसी डब्यात वाढदिवस साजरा करताना मद्यपान करण्यात आले, ही बाब चौकशीदरम्यान आता स्पष्ट झाली. यात पाच कंत्राटी, तर दोन नियमित रेल्वे कर्मचारी सहभागी असल्याचे सर्वश्रुत आहे. उपप्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या चौकशीअंती सोमवारी मध्य रेल्वे भुसावळ येथील मुख्यालयात अहवाल पाठविणार असल्याची माहिती आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी सुरू झाली आहे. पाच कर्मचारी कंत्राटी, तर दोन रेल्वेचे नियमित कर्मचारी आहेत. झालेला प्रकार अतिशय धक्कादायक असून, याप्रकरणी वरिष्ठांना वस्तुनिष्ठ अहवाल पाठवू. यात नियमानुसार कारवाई केली जाईल. तसे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत.
- एम. एस. लोहकरे, उपप्रबंधक, अमरावती स्टेशन

सुरक्षा विभागाने पाठविला वायरलेस मेसेज
अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मुख्यालयाने घेतली आहे. याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याबाबत वरिष्ठांनी कळविले आहे. त्यानुसार आरपीएफ आणि उपस्टेशन प्रबंधकांनी तात्काळ संबंधितांचे बयाण नोंदविले आहे. यात काही जणांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी अंतिम अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे.

Web Title: Inquiry into 'that' case in Railway Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.