शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्मीर उत्सव’चे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

अमरावती : स्थानिक कॅम्प रोड स्थित आयएमए हॉल येथे आयोजित ‘कश्मीर उत्सव’ला नगरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कश्मीरी वस्त्रांच्या ...

अमरावती : स्थानिक कॅम्प रोड स्थित आयएमए हॉल येथे आयोजित ‘कश्मीर उत्सव’ला नगरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कश्मीरी वस्त्रांच्या खरेदीकरुता नागरिकांनी सदर प्रदर्शनाला प्रचंड गर्दी केली आहे. प्रदर्शनाचे शनिवार, ९ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन झाले. या प्रदर्शनात विविध आकर्षक वस्तू विक्रीस उपलब्ध असून, हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत खुले राहील. सदर प्रदर्शनात पशमीना शॉल, स्ट्रोल्स, कानी जमावर शॉल्स, एम्ब्रायडरी साड्या, सिल्क व कॉटनच्या साड्या, लेडिज एम्ब्रायडरी कुर्ती, पाने शोज, कफतान, ड्रेस मटेरियल, किट, सिल्क पॅन्ट, कॉटन कुर्तीज, स्टोन अँड सिल्व्हर ज्वेलरी, एम्ब्रायडरी बॅग्स, रेडीमेड ड्रेसेस व गिफ्ट आयटम्स विक्रीस उपलब्ध आहेत. कश्मीरच्या विभिन्न क्षेत्रातील सरकारद्वारे पुरस्कृत विणकर परिवाराच्यावतीने निर्मित वस्तू सदर प्रदर्शनात उपलब्ध असून स्वेटर व शाॅलवर विशेष सूट आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे, ड्राय फ्रूट्स काऊंटर आहे.

कश्मीरच्या विणकरांना मंच उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन सदर प्रदर्शनाचे संचालक शौकत झरगर यांनी केले. जगप्रसिद्ध पश्मीना शॉल तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. या शॉलचे वजन खूप कमी असून, ही अधिक उबदार असते. कानी शॉल व स्ट्रोल्स वूडन स्टिकपासून तयार करतात, त्याचप्रमाणे पेपर मॅशो, बॉक्सेस, ज्वेलरी पेन्सिल बॉक्सेस, कार हँगिंग, वॉल हँगिंग, साड्यांमध्ये पश्मीना प्रिंटेड साडी, ज्यूट साडी, कप्तान साडी व इतर अनेक प्रकारच्या साडीज उपलब्ध आहेत, ज्या अतिशय सॉफ्ट व आरामदायी आहेत. या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन संचालक शौकत झरगर यांनी केले.