शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नकली सोने विकणाऱ्यांना अमरावतीत पकडले

By admin | Updated: March 17, 2015 01:33 IST

नकली सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन परप्रातींय आरोपींना मालेगाव

अमरावती : नकली सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन परप्रातींय आरोपींना मालेगाव पोलिसांनी अमरावतीमधील राजुरा जंगलात पकडले. संदीप पवार(२५, बैतूल) व राजेंद्र पवार(३८,रा. उमठा, नागपूर) असे, अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस सुत्रानुसार नकली सोने विकणारी ही टोळी महाराष्ट्रभरात सक्रिंय असून यामध्ये आठ ते दहा आरोपीचा समावेश आहे. यामधील आरोपींनी मालेगाव येथील कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत एका व्यक्तीला कमी पैश्यात सोने देण्याची बतावणी करून ४ लाखांने लुबाडले आहे. या तक्रारीवरून तेथे आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी ग्राहक बनून आरोपींशी सपर्क होता. त्याच्यांशी फोनवर सवांद साधून सोमवारी सोन्याचे सिक्के अमरावतीत देण्याचे आरोपींना सांगितले होते. या आधारे कॅम्प पोलीस ठाण्याचे जमादार खैरनार, पोलीस शिपाई गांगुर्डे, भामरे आणि वाघ अमरावतीत पोहचले. आरोपींनी त्यांना राजुरा येथील जंगलात बोलाविले होते. त्यामुळे फे्रजरपुरा पोलिसांच्या मदतीने कॅम्प पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी फ्रेजरपुरा डिबी स्कॉडचे गजानन बरडे, अमोल मनोहरे, विजय राऊत, रोशन किरसान, नीलेश मेहरे, विजय बहादुरे यांनी राजुरा जगंलात सापळा रचला. दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठ्या शीताफीने पोलिसांनी आरोपींना पकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांनी यश मिळाले. दोन्ही आरोपींना कॅम्प पोलिसांनी सोबत नेले. या घटनेमुळे राजुरा जंगल भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलीस घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले असता परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.दोन किलो नकली सोन्याचे सिक्के जप्तमालेगाव व फे्र जरपुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील दोन किलो नकली सोन्याचे सिक्के जप्त केले. आरोपींना गुप्तधन मिळाले होते, ते नकली सिक्के असल्याने शांतीसाठी पूजापाठ केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. जप्त केलेले नकली सोने आरोपी २ लाख रुपयांमध्ये विकणार होते.