कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार; हमी घेण्याआधी विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 20:21 IST2026-03-12T20:21:20+5:302026-03-12T20:21:59+5:30

Amravati : एखाद्या कर्जासाठी हमीदार राहणे, ही केवळ औपचारिक बाब नसून, मोठी आर्थिक जबाबदारी असते. कर्जदाराने हप्ते थकविल्यास बैंक थेट हमीदाराकडूनही वसुली करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

If the borrower defaults on the installments, recovery can also be done directly from the guarantor; think before taking a guarantee | कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार; हमी घेण्याआधी विचार करा

If the borrower defaults on the installments, recovery can also be done directly from the guarantor; think before taking a guarantee

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
एखाद्या कर्जासाठी हमीदार राहणे, ही केवळ औपचारिक बाब नसून, मोठी आर्थिक जबाबदारी असते. कर्जदाराने हप्ते थकविल्यास बैंक थेट हमीदाराकडूनही वसुली करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणाच्या कर्जासाठी गॅरेंटर राहताना संबंधित कायदेशीर नियम आणि संभाव्य जोखीम समजून घेणे आवश्यक ठरत आहे.

कर्ज व्यवहारांमध्ये अनेकदा नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी हमीदार राहण्याची विनंती केली जाते; मात्र कर्जदाराने कर्जाची परतफेड न केल्यास बँक हमीदाराकडेही वसुलीसाठी वळू शकते. त्यामुळे हमीदार होण्यापूर्वी कर्जाच्या सर्व अटी, नियम आणि जबाबदाऱ्या नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुणाच्या कर्जासाठी हमीदार (गॅरेंटर) राहणे ही केवळ स्वाक्षरी करण्याइतकी सोपी गोष्ट नाही, तर ती मोठी आर्थिक जबाबदारी आहे.

कोणतेही बँक कर्जदार किंवा हमीदारास बळजबरीने सही करण्यास दबाव टाकत नाही. कर्जाचे सर्व कायदेशीर कागदपत्रे कर्जदार आणि हमीदार यांना पूर्वीपासून, दोघांची संमती व हमी घेऊनच कर्ज मंजुरी करते.

काय होणार कारवाई?

बैंक आता वसुलीसाठी कर्जदाराची वाट न पाहता थेट गॅरेंटरच्या मालमत्तेवर जप्ती आणू शकते. बैंक गॅरेंटरच्या बँक खात्यातून पैसे वळते करू शकते किंवा त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेवर कायदेशीर दावा सांगू शकते.

कर्जासाठी हमीदाराचा नियम काय ?

जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेते आणि बैंक सुरक्षिततेसाठी जास्तीची खात्री मागते, तेव्हा 'गॅरेंटर'ची गरज भासते. कायद्यानुसार, 'कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी' अंतर्गत जर मूळ कर्जदाराने कर्ज फेडले नाही, तर ती फेडण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी हमीदाराची असते. हमीदार हा केवळ साक्षीदार नसून तो कर्जाचा सह-जबाबदार असतो.

कायदेशीर जोखीम समजून घ्या

अनेकदा मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी कर्जासाठी गॅरेटर राहताना संबंधित कायदेशीर नियम आणि संभाव्य जोखीम समजून घेणे आवश्यक ठरत आहे. अन्यथा पुढे अडचणीचे ठरते.

कर्जदार, गॅरेंटरवर एकाच वेळी 'दिवाळखोरी प्रक्रिया'

बँक आता इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड (आयबीसी) अंतर्गत कर्जदार कंपनी आणि तिची हमी देणारी व्यक्ती या दोघांविरुद्ध एकाच वेळी 'दिवाळखोरी प्रक्रिया' सुरू करू शकते. यामुळे हमीदाराची वैयक्तिक पत खराब होते.

हमीदार राहताना काय काळजी घ्यावी ?

हमीदार होण्यापूर्वी कर्जदाराची आर्थिक स्थिती आणि कर्ज परतफेडीची क्षमता तपासावी. कर्ज करारातील अटी नीट वाचाव्यात. कर्जाची रक्कम, कालावधी आणि जोखीम समजून घेतल्याशिवाय सही करू नये. आवश्यक असल्यास कायदेशीर सल्लाही घ्यावा.

नाव मागे घेण्याची प्रक्रिया

हमीदार म्हणून नाव मागे घेणे कठीण असते. यासाठी बँक, कर्जदार आणि हमीदार या तिघांची संमती आवश्यक असते. जोपर्यंत कर्जदार दुसरा सक्षम हमीदार बँकेला देत नाही किंवा कर्जाचा काही हिस्सा भरत नाही, तोपर्यंत बँक सहसा गॅरेंटरला मुक्त करत नाही.

हमीदारही जबाबदार!

कायदेशीरदृष्ट्या कर्जदार आणि हमीदार दोघेही कर्ज फेडण्यासाठी समान जबाबदार मानले जातात. त्यामुळे कर्जदाराने पैसे न भरल्यास बँक थेट हमीदाराकडून वसुली करू शकते.

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास ?

मूळ कर्जदाराचा मृत्यू झाला तरी गॅरेंटरची जबाबदारी संपत नाही. अशा स्थितीत कर्जदाराच्या वारसांकडून वसुली न झाल्यास, बँकेला कर्ज फेडण्यासाठी गॅरेंटरला कायदेशीर नोटीस बजावते.

"कर्जासाठी जामीन राहणे म्हणजे आर्थिक जबाबदारी स्वीकारणे आहे. कर्जदाराची आर्थिक क्षमता, कर्जाची रक्कम आणि परतफेडीची अट पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय जामीन राहू नये."
- अॅड. स्वप्निल मोहोड, आर्थिक सल्लागार

Web Title : गारंटी देने वालों सावधान! बैंक सीधे आपसे वसूली कर सकते हैं।

Web Summary : उच्चतम न्यायालय का स्पष्टीकरण: उधारकर्ता चूक करने पर गारंटर उत्तरदायी हैं। बैंक संपत्ति जब्त कर सकते हैं। दूसरों के लिए ऋण की गारंटी देने से पहले जोखिमों को समझें। गारंटर और उधारकर्ता संयुक्त दिवालियापन कार्यवाही का सामना कर सकते हैं। उधारकर्ता की वित्तीय स्थिति और ऋण शर्तों को ध्यान से जांचें।

Web Title : Guarantor beware! Banks can recover dues directly from you.

Web Summary : Supreme Court clarifies: Guarantors are liable if borrowers default. Banks can seize assets. Understand risks before guaranteeing loans for others. Guarantors and borrowers can face joint insolvency proceedings. Check borrower's finances and loan terms carefully.