शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

आदर्श शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:02 IST

जिल्हा परिषदेमार्फत २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने बुधवारी गौरविण्यात आले. चार शिक्षकांना विशेष पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेमार्फत २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने बुधवारी गौरविण्यात आले. चार शिक्षकांना विशेष पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. विशेष अतिथी म्हणून शिक्षण सभापती जयंत देशमुख, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर , श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र बहुरूपी, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती वाहिदाबी युसूफ, सभापती उईके उपसभापती खातदेव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके, नितीन उंडे आदीची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट अध्यापनकार्य करणाºया १४ शिक्षकांसह चार शिक्षकांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गजानन कासमपुरे या शिक्षकाला शासनाकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शिक्षकांच्या कार्याप्रमाणे इतरही शिक्षकांनी शैक्षणिक कार्य करावे, असे आवाहन मार्गदर्शनपर मनोगतात केले. यावेळी शिक्षण सभापती जयंत देशमुख यांंनी जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘सन्मान गुणवत्तेचा’ उपक्रम आगामी कालावधीत राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर यांनी केले. संचालन शीला मसराम यांनी केले. उपशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, संदीप बोडखे, अशोक इंगळे, पुनसे, धुर्वे, गणेश बोपटे, मेटकर, रूपराव सावरकर, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी राजेश सावरकर, सुनील कुकडे, विलास देशमुख, सुरेंद्र मेटे , सूरज वाघमारे आदी उपस्थित होते.पुरस्काराचे मानकरीसन २०१७-१८ मध्ये संदीप खडेकार (अमरावती), उज्वल पंचवटे (भातकुली), प्रमोद ढाकोलकर (अचलपूर), विनोद बिजवे (अंजनगाव सुर्जी), कुशल व्यास (चांदूर रेल्वे), प्रतिभा अर्डक (चांदूर बाजार), विलास बनसोड (चिखलदरा), मो. निसार मो. खलील (दर्यापूर), दिनेश शर्मा (धामणगाव रेल्वे), अर्चना मेश्राम (धारणी), चंदा कडू (मोर्शी), वसीम फरहत खलील फरहत (नांदगाव खंडेश्वर), कृष्णा चिंचमलकर (तिवसा), भगवंत गजभिये (वरूड) यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.विशेष गौरवाने यांचाही सन्मानजिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल गजानन कासमपुरे यांचा, तर विशेष पुरस्काराने उमेश शिंदे, रमेश राठोड ( नांदगाव खंडेश्वर), रोहिणी चव्हाण (अचलपूर) यांचा विशेष पुरस्काराने जिल्हा परिषदेने गौरव केला.