अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:06 IST2019-01-04T17:04:35+5:302019-01-04T17:06:35+5:30

अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला

I Will Protect Minorities Chandrashekhar Azad's warning | अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा 

अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, चंद्रशेखर आझाद यांचा इशारा 

ठळक मुद्दे देशात शिक्षण, औषधोपचार आणि न्याय मोफत देणारे सरकार हवे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार निवडणुकीत एकाही व्यक्तीचे मत भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला जाणार नाही, याची खबरदारी घ्या

अमरावती  - या देशात शिक्षण, औषधोपचार आणि न्याय मोफत देणारे सरकार हवे आहे.  सध्या देशात मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. मात्र अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे.  

सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी आज अमरावती येथे जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना चंद्रशेखर आझाद म्हणाले की, "शिक्षण, औषधोपचार, न्याय या सर्वांसाठी जनतेला पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या देशात शिक्षण, उपचार, न्याय मोफत देणारे सरकार आणायचे आहे. आजच्या घडीला देशाला  पैसेवाले, दलाल नव्हे तर जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत.''  

यावेळी देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधातही चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवला."मुसलमानावर अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही,''असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच ओबीसींच्या हक्कांसाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. 

बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला होता. मात्र आमच्यातले काही घटक संघटीत झाले नाही, अशी खंत आझाद यांनी व्यक्त केली. हा देश तुमच्या बापाच्या इशाऱ्यावर नाही, तर देशाच्या संविधानानुसार चालेल. संविधानाचे रक्षण हाच भीम आर्मीचा उद्देश, संविधानाला धक्का बसल्यास गप्प बसणार नाही. त्याला भीम आर्मी आपल्या शैलीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही आझाद यांनी दिला. तसेच यापुढच्या निवडणुकीत एकाही व्यक्तीचे मत भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला जाणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहनही आझाद यांनी केले. 

 

Web Title: I Will Protect Minorities Chandrashekhar Azad's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.