शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल मका काट्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:13+5:302021-02-05T05:31:13+5:30

फोटो आहे. ०३ एस धारणी ऑनलाईन प्रक्रिया धाब्यावर ठेवल्याची शेतकऱ्यांची तक्रार, चौकशीची मागणीधारणी : रीतसर नोंदणी करून खरेदी केंद्रावर ...

Hundreds of quintals of maize without farmers cutting | शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल मका काट्याविना

शेतकऱ्यांचे शेकडो क्विंटल मका काट्याविना

फोटो आहे. ०३ एस धारणी

ऑनलाईन प्रक्रिया धाब्यावर ठेवल्याची शेतकऱ्यांची तक्रार, चौकशीची मागणीधारणी : रीतसर नोंदणी करून खरेदी केंद्रावर मका विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांना १५ दिवस ताटकळत ठेवल्यानंतर १ फेब्रुवारी रोजी मुदत संपल्याचे आदिवासी विकास महामंडळाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेकडो क्विंटल मका आता खुल्या बाजारात कुठल्याही किमतीत विकावा लागेल. झिल्पी आणि धूळघाट येथील शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने मका खरेदीकरिता वाढीव मुदत ३१ जानेवारी देण्यात आली होती. त्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. नोंदणी केल्याप्रमाणे साद्राबाडी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रात १८ जानेवारी रोजी दिलेल्या तारखेत शेतकऱ्यांनी मका आणला. १५ दिवसांपर्यंत या धान्याचे मोजमाप न करता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर १ फेब्रुवारी रोजी मुदत संपल्याचे घोषित करून पंधरा दिवसांपासून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्याचा प्रकार घडला. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये महामंडळाविरुद्ध रोष व्याप्त आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, मुदत संपल्यानंतरसुद्धा १ फेब्रुवारी रोजी नारवाटी येथील एका शेतकऱ्याची मका खरेदी करण्यात आल्याचीसुद्धा तक्रारीत नमूद आहे.

-------------

प्रतिक्रिया येत आहे.

Web Title: Hundreds of quintals of maize without farmers cutting