दिवाळीत कांदा गाठणार शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:34+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे.

Hundreds of onions will reach Diwali | दिवाळीत कांदा गाठणार शंभरी

दिवाळीत कांदा गाठणार शंभरी

Next
ठळक मुद्देजागतिक बाजारपेठेत ४५ रुपये दर : पावसाळी कांद्याची आवक घटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांदा सद्यस्थितीत ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळी कांद्याचे पीक जळाल्याने आवक घटणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत हे दर दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे. सध्या येथील मंडईत कांद्याची ७०० ते ८०० कट्टे आवक होत असून, ३० ते ५० रुपये दराने विक्री होत असल्याचे माहिती व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून जिल्ह्यात कांद्याची आवक सुरू आहे. यंदा सलग पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी ७५ टक्के रोपी जळाल्यामुळे कांद्याचे केवळ २५ टक्के उत्पादन होणार आहे. ते इतरत्र निर्यात होणार नाही. त्यामुळे यंदा कादा टंचाईची शक्यता पाहता शासनाने निर्यातबंदी केली.

अफगाणिस्थानातून बोलावणार
यंदा कांद्याचे नियमित उत्पादन होऊ शकणार नसल्याने पर्याय म्हणून अफगानिस्थानातून कांदा बोलावला जाऊ शकतो. परंतु, तेथील कांदा अर्ध्या किलोहून जादा वजनाचे राहत असल्याने केवळ खाणावळी, ढाबा, हॉटेलमध्येच वापरा जाऊ शकतो.

‘लोकमत’चे भाकित खरे ठरले
'लोकमत'ने गत आठवड्यात कांद्याचे दर ५० रुपये होणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. ते अगदी आठवडभरात खरे ठरले.

कांद्याची पावसाळी रोपे ७५ टक्के जळाल्याने यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणारी आवक नगण्य राहण्याची शक्यता आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत कांदा शंभरी गाठणार, हे निश्चित.
- सतीश कावरे
कांदा व्यापारी, अमरावती

Web Title: Hundreds of onions will reach Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा