शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

अंबा नाल्यात शेकडो टन प्लास्टिक

By admin | Updated: December 9, 2015 00:15 IST

शहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते.

महापालिकेचे दुर्लक्ष : कचरा, प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जावैभव बाबरेकर अमरावतीशहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते. दररोज शहरातील २५० टन कचरा कंपोस्ट डेपोत टाकण्यात येत असतानाही नाल्यामध्ये शेकडो टन प्लास्टिक गोळा झाला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अंबानगरीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान सुरु केले आहे. मात्र, अमरावती महानगर पालिकेचे स्वच्छतेकडे विशेष लक्ष नाही. शहरातील चारही झोनमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. मात्र, बहुतांश परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे शहरच कचरामय झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत उदासीनता निर्माण होत आहे. काही परिसरात कचराकुंडी आहेत, तर काहींमध्ये अद्यापही नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. योग्य प्रकारे उचल्या जात नसल्यामुळे अर्धाअधिक कचरा कन्टेंनरमध्ये पडून राहत आहे काही परिसरात कचरा कुंडीतच कचऱ्यांचे ढिगारे जमले आहे. एकीकडे सुळकी येथील कम्पोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यातच अमरावतीतून निघणारा कचरा कंपोेस्ट डेपोमध्ये नेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळींनी कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजनासंदर्भात आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने अपूर्णच आहेत. आश्वासने हवेत विरलीअमरावती : अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळीने कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासने दिले आहेत. मात्र, अद्याप कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने पूर्ण झालीच नाहीत. या कचऱ्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक असल्यामुळे ती हवेमार्फत विविध ठिकाणी पसरतानाही दिसून येत आहे. लाखो घरातून निघणारा हजारो टन कचरापैकी काही कचरा हा कम्पोस्ट डेपोत टाकण्यात येत असून काही कचरा हा शहरातील नाल्यामध्ये गोळा होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातून गेलेल्या नाल्यामध्ये हजारो टन कचरा तसाच पडून आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर वर्षभर नाल्यात कचरा गोळा झाल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.