राज्यात नेमके बिबटे किती? वनविभागासाठी अचूक आकडेवारी सांगणे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:00 IST2025-11-12T15:59:03+5:302025-11-12T16:00:32+5:30

Amravati : दरवर्षी वने व वनविभाग वाघ, बिबट्यांसह अन्य सहा वन्यजीवांची प्रगणना करतात आणि दर तीन वर्षांनी केंद्रीय पर्यावरण व वने आणि हवामान बदल मंत्रालय त्या आकडेवारीची माहिती जारी करत असते.

How many leopards are there in the state? It is a challenge for the forest department to provide accurate statistics. | राज्यात नेमके बिबटे किती? वनविभागासाठी अचूक आकडेवारी सांगणे आव्हान

How many leopards are there in the state? It is a challenge for the forest department to provide accurate statistics.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्यातील वाघांचा नेमका आकडा सांगणाऱ्या वनविभागासाठीबिबट्यांची अचूक आकडेवारी सांगणे आव्हान ठरले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातबिबट्याने, तर विदर्भात वाघाने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे बिबटे नियंत्रणात कसे आणायचे, याबाबत वनविभागाचे अधिकारी पेचात पडले आहेत.

दरवर्षी वने व वनविभाग वाघ, बिबट्यांसह अन्य सहा वन्यजीवांची प्रगणना करतात आणि दर तीन वर्षांनी केंद्रीय पर्यावरण व वने आणि हवामान बदल मंत्रालय त्या आकडेवारीची माहिती जारी करत असते. राज्याने १९८० नंतर वाघ संरक्षणावर विशेष भर दिला. मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यात आली. वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले. मात्र, बिबट्याच्या बाबतीत वनविभाग अनभिज्ञ राहिला. बिबटे परिस्थितीशी सहज जुळून घेतात. मानवी अधिवासांत भटकून आलेले बिबटे आता रुळले आहेत. बिबटे मानवावर हल्ले करीत नाहीत, असा दावा वनविभाग करायचा. मात्र, आता बिबट्याचे मानवावरचे हल्ले वाढले आहेत. वनविभागाने बिबट्यांवर लक्ष न देता केवळ वाघ संवर्धनावर भर दिल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबटे सशक्त झाले आहेत. 

५००० बिबटे बिबट्यांच्या संख्येबाबत वन्यजीव विभागाकडे अद्याप अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात सुमारे २ हजार बिबटे आहेत, तर नाशिक आणि विदर्भात किमान ३ हजार असे ५००० बिबट्यांची संख्या झाली आहे.

Web Title: How many leopards are there in the state? It is a challenge for the forest department to provide accurate statistics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.