शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नरबळीच्या पुजेत तिघेच कसे ?

By admin | Updated: August 19, 2016 00:12 IST

अलौकीक शक्ती प्राप्त करण्यासाठी नरबळीचा जो प्रयत्न शंकर महाराजांच्या आश्रमात करण्यात आला,

अमरावती : अलौकीक शक्ती प्राप्त करण्यासाठी नरबळीचा जो प्रयत्न शंकर महाराजांच्या आश्रमात करण्यात आला, त्या नरबळीच्या विधीत तिघांचाच सहभाग कसा, हा प्रश्न या प्रकारातील गुन्ह्यांचा अभ्यास केल्यावर निर्माण होतो. पोलिसांनाही हा प्रश्न निर्माण झाल्यास आणखी धक्कादायक वास्तव उघड होऊ शकेल. नरबळी, अघोरी विद्या, काळी जादू यासंबंधीच्या संकल्पना आणि त्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या विधी-पुजांमध्ये संख्येने तीनपेक्षा अधिक लोकांचा भरणा असल्याचेच प्रकर्षाने स्पष्ट होते. अलौकीक शक्ती, गुप्तधनाचा शोध, नोटांचा पाऊस असल्या प्रकारांसाठी नरबळी दिले जातात. मुळात हे सारे थोतांड असले तरी मनगटात ताकद अन् स्वकर्तृत्वावर विश्वास नसलेली मंडळी बाबा, बुवा किंवा महाराजांच्या मागे लागून या प्रकारांवर विश्वास ठेवतात. ही विद्या अस्तित्वात आहे, ही अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांमध्ये सुशिक्षित आणि प्रतिष्ठीत लोकांचाही टक्का दखलनीय आहे. महाराष्ट्र राज्यासह देशभरात या प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गोंडस, निरागस, पवित्र तसेच पायाळू मुला-मुलींचा नरबळी दिल्याने विशेष शक्ती प्राप्त होतात, असे ही मंडळी मानतात. आत्मविश्वास गमावलेले असले लोक अशी विद्या जाणणाऱ्या महाराजांच्या नादी लागतात. भान हरपलेली ही मंडळी गुरूमहाराजाने सांगितल्यानुसार कुठलाही गुन्हा करायला तयार होतात. अगदी पोटच्या मुलांचे बळी दिल्याचेही गुन्हे उघडकीस आले आहेत. असली मंडळी नरबळी हा विधीवत आणि अत्यंत धार्मिक प्रकार मानतात. बळी चढविल्या जाणाऱ्या व्यक्तीचीही पुजा केली जाते. त्याच्या पवित्र रक्ताची आहुती आणि छाटलेल्या मुंडक्याची पुजा केली जात असल्याच्याही नोंदी उपलब्ध आहेत. अमावस्या, पौर्णिमा किंवा विशिष्ट सणांच्याच मुहूर्तावर केलेली पूजा शक्ती प्रदान करते, अशी अंधश्रद्धा आहे. नरबळीच्या गुन्ह्यांमध्ये नरबळी देणाऱ्या व्यक्तिंच्या पाठीशी त्यांचे गुरु असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. नरबळी घडवून आणणारे मोहरे असतात. त्यांना 'आॅपरेट' करणारे, बहुदा वयस्क श्रेणीतील व्यक्ती या घटनेतील मुख्य सुत्रधार असतात.