शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विहिरी कोरड्या ठण्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:08 PM

परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला.

ठळक मुद्देरहिवासी त्रस्त : बुधवारा परिसरात पाणीटंचाईचे सावट

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रथमच नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. परकोटाआतील ४० विहिरींपैकी तब्बल २५ विहिरी कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.गाळ उपसा होणे गरजेचेस्थानिक रहिवाशांच्या मते गेटच्या आतील ४० ते ४५ वर्षांपासून विहिरींची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे विहिरीत कचरा व गाळ साचला आहे. त्या स्वच्छ केल्यास पाणी उपलब्ध होऊ शकेल. विहिरीचा गाळ उपसा करणे, टॅन्करद्वारे पाणी पुरवठा करणे, बोअरवेल करणे अशाप्रकारची कामे प्रशासनाने त्वरीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्तांना शंभरावर स्थानिक रहिवाशांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सोपविले आहे. यावेळी विजय अग्निहोत्री, बंडु बाबरेकर, विलास काळे, प्रमोद गंगात्रे, पप्पु खडसे, विमल कारंजकर, पंकज धर्माळे, शाम शिंगारे, रमेश कोनलाडे, आर.एम.माकोडे, रविंद्र इंगळे, ज्ञानेश्वर भोरे, सुरेश वानखडे, एन.के.जोशी, गजानन गंगात्रे, रेखा लोखंडे, वैशाली कुऱ्हेकर, हर्षदा ठोसर, जयश्री भिसीकर, अपर्णा बनसोड, माधुरी अनासाने, आशिष पांडे, अरुणा पंढरपुरे, शोभा खोलापुरे, मालती जहागीरदार, अजय गुल्हाने, विजया पाटणे आदी उपस्थित होते. शंभर वर्षांपासून बुधवारा परिसरातील नागरिक ऐतिहासीक विहिरीच्या पाण्याचा उपयोग करीत आहेत. मात्र, याच विहिरींमध्ये गणपती, दुर्गादेवी विसर्जन होत असल्यामुळे गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कल बोअरवेलकडे अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकसंख्यावाढीसोबतच पाण्याची मागणी वाढत आहे. त्यातच शहर सिमेंटीकरण होत असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी लोकचळवळीतून नागरिकांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा, रेनहार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना करणे व जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे विहिरी स्वच्छतेचा विषय घेऊन जात आहे. मात्र, त्यांचा कल बोअरवेलकडे अधिक आहे. विहिरीची स्वच्छता करावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत.- बंडू बाबरेकर, नागरिकया ब्रिटिशकालीन विहिरींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने त्या पहिल्यांदाच आटल्यात. त्यामुळे प्रथमच पाणीटंचाई भासत आहे. प्रशासनाने विहिरींच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.- विजय अग्निहोत्री, नागरिकविहिरीतील गाळ उपसण्याचे काम 'रिस्की' आहे. विहिरींच्या स्वच्छतेसाठी मशिनचा वापर केला जाईल. दोन दिवसांत मशीन येईल. त्यानंतर विहिरी सफाईचे काम सुरु होईल.- हेमंतकुमार पवार,महापालिका आयुक्तदरवर्षी मे महिन्यात शहरातील विहिरी कोरड्या पडतात. जुन्या अमरावतीत पाणीसाठा चांगला आहे. विहिरीतील गाळ मशिनद्वारे काढल्यास तो प्रश्न निकाली लागेल.- विलास इंगोले,नगरसेवक, बुधवारा

या विहिरी पडल्या कोरड्याबुधवारा चौकातील आझाद हिन्द मंडळ स्थित अग्निहोत्री यांच्या वाड्यातील ऐतिहासीक विहिर कोरडी ठण पडल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसली. त्याचप्रमाणे निलकंठ मंडळाजवळील शाळेच्या आवारात असणारी विहिर, डोळे वाड्याजवळील विहिर, कोदाळे वाड्यातील विहिर, बंजरंग चौकातील विहिर याच्यासह अन्य काही विहिरीतील पाणी आटल्याचे निदर्शनास येत आहे.