शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

उच्च वंशावळीच्या कालवडी, रेडींची होणार पैदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

‘लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा’ अत्यल्प दरात, दुग्धोत्पादन वाढीसाठी पशुधन विकास महामंडळाचा निर्णय अमरावती : उच्च वंशावळीच्या कालवडी आणि रेडींची पैदास ...

‘लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा’ अत्यल्प दरात, दुग्धोत्पादन वाढीसाठी पशुधन विकास महामंडळाचा निर्णय

अमरावती : उच्च वंशावळीच्या कालवडी आणि रेडींची पैदास करण्यासाठी राज्यात अत्याधुनिक तंत्राने कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लिंग विनिश्चिती वीर्यमात्रा ( सेक्स साॅर्टेड सिमेन) वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभरात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची पैदास होणार आहे.

जिल्ह्यात ही वीर्यमात्रा केवळ ८१ रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्याच्या पशुधन विकास महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कालवडी पैदासीसाठी जातिवंत वळूंचे वीर्य घेऊन त्यातील मादीची गुणसूत्रे अत्याधुनिक तंत्राद्वारे बाजूला करण्यात येणार आहेत. ती वीर्यमात्रा प्रयोगशाळेत फ्रीज करून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार ती वीर्यमात्रा शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींना देण्यात येणार आहे. त्यातून ९० टक्के कालवड आणि रेडींची पैदास होणार आहे. या तंत्राने पैदास झालेली दुधाळ गाय किंवा म्हैस चार ते पाच लिटर जास्त दूध देऊ शकतात, असे संशोधनातून सिद्ध झाल्याचे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

वीर्यमात्रा ८१ रुपयांत मिळणार

लिंगविनिश्चिती केलेल्या वीर्यमात्रेची किंमत १ हजार ते १२०० रुपये आहे. ती महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ ५७५ रुपयांनी खरेदी करणार आहे. ती दूध उत्पादकांना कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून ८१ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बॉक्स

वरूडमध्ये प्रयोग

अमरावती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने यापूर्वी वरूड तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर गतवर्षात कृत्रिम रेतनासाठी लिंगविनिश्चिती वीर्यमात्राचा वापर करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर गिरी यांच्या मार्गदर्शनात एकूण ६५ वासरे जन्माला आली. त्यापैकी ६० मादी वासरे आहेत. सेक्स सॉर्टेड सिमेनचा वापर केल्याने ९० टक्क्यांपेक्षा जास्त कालवडी जन्माला आल्याचे यात सिद्ध झाले आहे.

कोट

कृत्रिम रेतनामध्ये यापुढे लिंग विनिश्चिती वीर्यमात्रांचा वापर करणे आवश्यक आहे. उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण करून दुग्धोत्पादनात वाढ होईल. कृत्रिक रेतनाच्या पारंपरिक धोरणात पशुसंवर्धन विभागाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मादी वासरे पैदास करणे अत्याधुनिक तंत्राद्वारे शेतकऱ्यांचे हिताचे आहे.

- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती