शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमधील मालमत्तांवर टाच !

By admin | Updated: March 30, 2016 00:40 IST

एमआयडीसीमधील थकीत मालमत्ता करधारकांच्या मालमत्तांवर टाच येण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन स्थगिती उठल्याने जप्तीची कारवाई ...

न्यायालयाने स्थगिती उठवली : ३.५० कोटींचा कर थकीतअमरावती : एमआयडीसीमधील थकीत मालमत्ता करधारकांच्या मालमत्तांवर टाच येण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन स्थगिती उठल्याने जप्तीची कारवाई करून करवसुलीचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सुरेंद्र देशमुखविरुद्ध महापालिका आयुक्त या प्रकरणातील स्थगिती उठविली. कर थकविल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने एमआयडीसीमधील मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस पाठविला होत्या. जप्तीच्या कारवाई विरोधात ‘सिपॉन सिरॅमिक’चे प्रोप्रायटर सुरेंद्र देशमुख व अन्य ३७ मालमत्ताधारक मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात गेले होते. एमआयडीसीमधील व्यावसायिकांकडे तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. दरम्यान नागपूर खंडपीठाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या जप्तीच्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेला ३.५ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार होते. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विदस्यीय खंडपीठाने जप्तीवरील स्थगिती उठवून याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता वेळ दिला. अमरावती एमआयडीसीमध्ये ५०४ उद्योग आहेत. त्यापैकी अनेकांनी कर भरला तर अन्य काही जण न्यायालयात गेले होते. स्थगिती उठल्याने आता जप्तीच्या कारवाईचा मार्ग प्रशस्त झाल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली आहे. हा तर उद्योजकांवर अन्यायअमरावती : तूर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आमची याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी १५ दिवसांचा अवधीही दिला आहे. या कालावधीत महापालिकेकडून कारवाई होत असेल तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. आम्ही नियमित करधारक आहोत. सन २०१५ पर्यंत आम्ही नियमाप्रमाणे कर भरला. तथापि आयुक्तांना आम्हाला विश्वासात न घेता दर मंजूर केले. ७० पैसे प्रतिचौरस फुट हा महापालिकेचा दर प्रत्यक्षात ४.२३ रुपयांपर्यंत पोहोचतो. १५ पैसे दर असताना आम्ही ९० पैशांनी कर भरत होतो. राज्यात एमआयडीसीतील उद्योजकांकडून मालमत्ता कर घेतला जात नाही. मात्र, अमरावतीत दामदुप्पट कर लावण्यात येतो. २.१० रुपयांऐवजी ७० पैसे दर ठरविताना महापालिकेने सन २००५ पासूनचा कर लादला. जप्तीच्या नोटीस अव्यवहार्य असल्याने आम्ही न्यायालयात गेलो. मंगळवारी नागपूर खंडपीठाने याबाबतची स्थगिती उठविली असली तरी निर्णयाची प्रत हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उद्योजक तथा याचिकाकर्ते सुरेंद्र देशमुख यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.