मेळघाटातील पाड्यांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 05:00 AM2021-07-24T05:00:00+5:302021-07-24T05:00:59+5:30

गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले.

Heavy rains in Melghat padas | मेळघाटातील पाड्यांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण

मेळघाटातील पाड्यांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण

Next
ठळक मुद्देसुसर्दाजवळ दरड कोसळली, घरे कोसळले, आरोग्य यंत्रणेची कसरत, गढूळ पाण्याने जलजन्य रोगाच्या साथीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा :  मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा तालुक्यातील अनेक मार्ग बंद होते प्रशासनाच्या वतीने कार्य सुरू असले तरी कोसळलेल्या पावसामुळे जलजन्य रोगाची साथ पसरण्याची भीती वाढविल्या जात असून यातून आरोग्य यंत्रणेची कसरत होणार आहे त्याचा फटका सर्वाधिक गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार आहे.
गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले. जामली आर. येथील सोना साकू कासदेकर यांचे घर कोसळले मनभंग, भिलखेडा, भांद्री, आडनदी, खीरपाणी, सावरपाणी, गरजदरी येथील शेतीचे नुकसान झाले.

काटकुंभ येथे दूषित पाण्याचा पुरवठा
तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी ग्रामपंचायतीच्या नाळ योजनेतून झाल्यामुळे तीन किलोमीटर अंतरावरून डोमा येथील हातपंपाचे पाणी नागरिकांना आणावे लागत आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावातील असल्याचे वास्तव आहे.

जलजन्य आजाराची भीती काय?
मागील दोन दिवसापासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आदिवासी पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, अनेक गावांमध्ये दूषित पाणी मिळत असल्याने जलजन्य आजाराची भीती वर्तविली जात आहे. याचा सर्वाधिक फटका गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार असल्याची भीती आरोग्य यंत्रणेने वर्तविली आहे. दुसरीकडे मार्ग बंद झाल्यास आजारी रुग्ण, गर्भवती मातांना उपचारार्थ दाखल करणे कसरतीचे असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी 'लोकमतशी बोलताना सांगितले.

बंद रस्ते व दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराची भीती आहे. सर्वाधिक आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे नागरिकांनी पाणी गाळून उकळून प्यावे असे आव्हान करण्यात आले आहे  थांबून थांबून पाऊस होत असल्याने डबक्यातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची भीती आहे. कुपोषित बालक, गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे.
सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

 

Web Title: Heavy rains in Melghat padas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस