शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह कोसळला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 5:00 AM

अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने संत्री गळून या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजगाव येथे एका युवकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर सोयाबीन सोंगलेल्या शेतकऱ्यांची पावसाने परीक्षा घेतली. अमरावती शहरात १० मिनिटे जोरदार अतिवृष्टी झाली. सकाळी लख्ख असलेले आभाळ दुपारी अचानक भरून आले आणि जोरदार वाऱ्यासह अर्धातास पाऊस कोसळला. चांदूर रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने सोयाबीनला झोडपले. त्यामुळे उघाड पाहून सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने संत्री गळून या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली. मोर्शी तालुक्यात अंबाड्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. धारणी परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने फेर धरला. धारणीत पाऊस बेपत्ता होता. दर्यापूर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. येवदा परिसरात विजेच्या कडकडे सह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. बडनेरयात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने रस्ता निर्मितीमुळे उडणारी धूळ खाली बसली. चुरणी परिसरात वादळी वारे वाहिले व जोरदार पाऊस झाला. अंजनगाव सुर्जीत ढगाळ वातावरण दिवसभर होते. पाऊस मात्र अगदी किरकोळ झाला. 

नांदगावात सोयाबीन उत्पादकांची दाणादाण नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नांदगाव परिसरात जोरात पाऊस कोसळला. बऱ्याच शेतकऱ्यांनी उघाड मिळाल्याने कापणी केलेले सोयाबीनचे पीक पावसात भिजले. काही शेतात सोयाबीनची गंजी जमिनीवर पडून आहे. या गंजीतही पाणी शिरले. 

अचलपुरात विजांसह जोरदार पाऊसअचलपूर : शहरासह तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. टक्कर चौक, बडी संगत,माळवेश पुरा, अकबरी चौक, चावल मंडी, तहसील रोड या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही वेळेकरिता वाहतूकदेखील बंद होती.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस