शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

By admin | Updated: September 30, 2015 00:27 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या ..

मंजुरीसाठी प्रस्ताव नाही : वरिष्ठ स्तरावरही निर्णयाची प्रतीक्षाअमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या औषधी खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक यांच्यास्तरावर बारगळून पडला आहे. यासोबतच औषध खरेदीसाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीनंतर स्थायी समितीत मंजूरी साठी व त्यानंतर सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव मंजुरीसाठी अद्यापही सादर करण्यात न आल्याने भविष्यात औषध टंचाईचा सामना करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत जिल्हा भरात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र ३३३ आरोग्य उपकेंद्र ,६५ आयुर्वेक दवाखाने, आणि १८ अ‍ॅलोपॅथीक दवाखान्याना औषधीचा पुरवठा केला जातो. यासर्व आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवितांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वतीने साधारपणे मी ते जून महिन्यात जिल्ह्यासाठी लागणाऱ्या औषध खरेदीचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्याच्या आरोग्य सेवा संचालक यांच्याकडे पाठवावा लागतो. याला वरिष्ठ स्तरावरूण मंजूरी मिळताच शासकीय पॅनेलवर असलेल्या पुरवठा दारामार्फत औषधीचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जवळपास ३६७ प्रकारचे विविध औषधे पुरविण्यात येतात. मात्र मागील काही दिवसापासून अमरावतीसह इतर जिल्हा परिषदांनी औषध पुरवठयाचाजवळपास १ कोटी ८६ लाखाचा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर सारोग्य सेवा संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप कुठल्याही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली नाही. यासोबतच जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत औषध खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यासाठी प्रस्ताव सभेच्या पटलावर ठेवावा लागतो मात्र हा प्रस्ताव अद्याप तरी मंजुरीसाठी सभागृहात आला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी औषध खरेदीचा मुद्दा निकाली न काढल्या गेल्यास जिल्हा औषध टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)औषध खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मंजूरी मिळेल आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव येत्या सभेत ठेवला जाईल औषधाची कुठलीही टंचाई भासणार नाही- नितीन भालेराव जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावतीआरोग्य केंद्रांना औषधी पुरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागाकडून खरेदीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर करणे अपेक्षित होते.येत्या सभेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले जातील.-सतीश हाडोळे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जिल्हा परिषद