शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरियाने काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २५२ नमुन्यांच्या तपासणीत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत प्रत्येकी एक चिकुनगुण्या रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकुनगुण्याचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम नंतरही होत असल्याने रुग्ण जेरीस आले आहेत. जिल्हाभरात डेंग्यूचे २५ रुग्ण आढळले आहेत. २५२ रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविले होते.

ठळक मुद्देजून महिन्याची स्थिती, स्वच्छतेची लागली वाट डासांची उत्पत्ती अन् उच्छाद वाढला

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा ग्राफ माघारताच  डेंग्यूचे २५, चिकुनगुण्या २ व मलेरियाच्या ६  रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील आऊटस्कड भागात स्वच्छतेची वाट लागल्याने डासांची उत्पत्ती अन् उच्छाद वाढला आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २५२ नमुन्यांच्या तपासणीत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत प्रत्येकी एक चिकुनगुण्या रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकुनगुण्याचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम नंतरही होत असल्याने रुग्ण जेरीस आले आहेत. जिल्हाभरात डेंग्यूचे २५ रुग्ण आढळले आहेत. २५२ रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविले होते. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७, चिखलदरा ६, अमरावती ३, चामदूर बाजार ४, नांदगाव खंडेश्वर २, चांदूर रेल्वे १ व तिवसा तालुक्यात एक   डेंग्यू  पॉझिटिव्ह आढळले. मलेरियाचे १,३६,०८६ नमुन्यांच्या तपासणीत सहा रुग्ण आढळून आले. हे सर्व आजार डासांपासून होत असल्याने घराच्या आसपास डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये डेंग्यूची लक्षणे वेगळी डोकेदुखी, अंगदुखी व सौम्य ताप असतो. काही प्रकरणात गंभीर लक्षणे दिसून येतात. रक्तदाब कमी होणे, प्लेटलेटमध्ये कमी येणे याशिवाय १०४ पर्यंत ताप, स्नायू, हाडे आणि सांधेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यांच्या मागे वेदना होतात, काही रुग्ण एका आठवड्यात बरे होतात, तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसतात.

चिकुनगुनियाचे लक्षण तीव्र सांधेदुखी थंडी वाजून ताप, उलटी, अन्नावरची इच्छा कमी होणे, डोकेदुखी यापैकी कोणतेही एक लक्षण चिकुनगुण्याचे असू शकते. काहीवेळा अंगावर पुरळदेखील येतात. सांधेदुखीमुळे रुग्णाला चालताना त्रास होतो. रक्ताची तसेच अन्य चाचण्या करून चिकुनगुण्याचे निदान केले जाते. काही रुग्ण आठवडाभरात, काही दोन ते तीन महिन्यांत बरे होतात. 

तापाच्या आजाराशी जुळतात लक्षणे मलेरियात थंडी वाजून ताप येणे, राहून राहून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी होणे, पोटदुखी, हगवण, अतिसार, अंगदुखी, शरीरात वेदना होणे, सांध्यामध्ये वेदना होणे, नाडीची गती जलद होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णांची तपासणी करून यकृत व लिव्हरचा आकार वाढला आहे का, याची तपासणी केली जाते व रक्ताची चाचणी करून निदान केले जाते.

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य