फक्त शरीर संबंध ठेवण्यासाठी घटस्फोट घेऊनही पत्नीला ठेवले अंधारात ! व्हाट्सअँप स्टेटसवरून पतीचे काळे कृत्य आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:48 IST2026-02-23T18:47:01+5:302026-02-23T18:48:13+5:30
Amravati : ज्या पतीवर विश्वास ठेवून पत्नीने संसाराची स्वप्ने पाहिली, त्याच पतीने तिला अंधारात ठेवून केवळ शारीरिक सुखासाठी तिचा वापर केला.

He kept his wife in the dark even after getting divorced just to have physical relations! The husband's dark deeds came to light through his WhatsApp status.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या पतीवर विश्वास ठेवून पत्नीने संसाराची स्वप्ने पाहिली, त्याच पतीने तिला अंधारात ठेवून केवळ शारीरिक सुखासाठी तिचा वापर केला. घटस्फोट झाल्याचे लपवून ठेवत, आपण पुन्हा सोबत राहू, असे खोटे आमिष दाखवून पत्नीवर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले आणि त्याचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी आरोपी पती अजय (वय ३२, रा. सरोज कॉलनी, अमरावती) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याने दुसरे लग्नदेखील केले.
फिर्यादी आणि आरोपी अजय यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. काही काळानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. जानेवारी २०२५ मध्ये पीडित महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याचदरम्यान, आरोपी अजयने एक कट रचला. त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि विवाद विसरून आपण पुन्हा एकत्र राहू, मी केस मागे घेतो, असे खोटे आश्वासन दिले. पीडिता त्याच्यासोबत राहण्यास तयार झाली. काही दिवस ते पुण्याला सोबत राहिले. फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता आपल्या माहेरी आमला येथे आली. तेव्हा आरोपीने दारूच्या नशेत तिला बेदम मारहाण केली. मारहाण करून तो थांबला नाही, तर तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्याशी बळजबरीने अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित केले.
दुसऱ्या लग्नाचा उलगडा; फसवणुकीचा कळस
ही बाब पीडितेपासून लपवून ठेवली माहेरी झालेल्या अत्याचारानंतर ती एकटीच पुणे येथे गेली. तेथे १९ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून आरोपी अजयने अंधारात ठेवून दुसरे लग्न केल्याचे समजले. जेव्हा तिने याबाबत जाब विचारला, तेव्हा त्याने आपला घटस्फोट झाला आहे, असे तिला सांगितले. याबाबत तिने वकिलाला विचारले असता त्यांनी जुलै २०२५ मध्येच त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. आरोपीने आणि घटस्फोटानंतरही तिच्यावर वारंवार बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केले. आपली फसवणूक झाल्याचे आणि आपल्या असहायतेचा गैरफायदा घेतल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने राजापेठ गाठून तक्रार दिली. ठाणेदार पुनित कुलट यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून गुन्हा नोंदविला.