अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवले.. ती गर्भवती राहताच तिला पळवून नेले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:23 IST2026-02-27T18:23:24+5:302026-02-27T18:23:50+5:30

Amravati : चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिला पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Had sex with a minor girl.. kidnapped her as soon as she became pregnant; case registered against both | अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवले.. ती गर्भवती राहताच तिला पळवून नेले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Had sex with a minor girl.. kidnapped her as soon as she became pregnant; case registered against both

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिला पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ नंतर हा प्रकार उघड झाला.

एफआयआरनुसार, अत्याचाराचा हा प्रकार १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडला. पीडित मुलगी ही १७ वर्षे २ महिन्यांची असून, काही दिवसांपूर्वी तिला पोटाचा त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. वैद्यकीय तपासणी आणि सोनोग्राफी रिपोर्टमध्ये ती मुलगी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्कादायक माहितीनंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघड झाला.

पीडिताने यात बदनामी टाळण्यासाठी तक्रार करण्यासदेखील मनाई केल्याचेही उघड झाले. तसे पीडिताच्या आईने ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबातदेखील नमूद केले आहे.

काय घडले?

मुख्य आरोपी प्रज्वल दीपक खडसे (२१, रा. ब्राह्मणवाडा थडी) याचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने पीडितेला तिच्या खोलीत बोलावून तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने या गोष्टीला विरोध केला असता, आपण दोघे लग्न करणार आहोत, यात काहीच वाईट नाही, असे खोटे आश्वासन देऊन तिला वारंवार आपल्या जाळ्यात ओढले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली.

घरून पळविले

हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून, मुख्य आरोपी प्रज्वल याने त्याचा साथीदार राजेश सुभाष खडसे याच्या मदतीने पीडित मुलीला फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. अद्याप आरोपींना अटक झालेली नसल्याचे समजते.

Web Title: Had sex with a minor girl.. kidnapped her as soon as she became pregnant; case registered against both