शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गुंफाबाई मेश्राम बसपच्या गटनेता

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता...

अमरावती : महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांना गटनेता पदावरुन पायउतार करीत सहा आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवली आहे. परिणामी दीड वर्षांपासून बसपमध्ये सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे.बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या आदेशान्वये सन - २०१२ मध्ये पार पडलेल्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहाही सदस्यांनी तटस्थ अशी भूमिका बजावावी, असा पक्षादेश होता. मात्र अजय गोंडाणे, दीपमाला मोहोड या दोन सदस्यांनी निवडणुकीत मतदान करुन पक्षादेश झुगारला होता. त्यामुळे पक्षाने या दोन्ही सदस्यांवर कारवाई करीत गोंडाणे यांच्या जागी गटनेतापदी गुंफाबाई मेश्राम यांची वर्णी लावली होती. त्याअनुषंगाने पक्षाने विभागीय आयुक्तांना पत्रसुद्धा दिले होते. परंतु या निर्णयाविरुद्ध अजय गोंडाणे हे उच्च न्यायालयात गेलेत. याचिका क्रमांक २६१६/२०१४ चा निर्णय देताना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजय गोंडाणे यांचे गटनेतापद खारीज करुन पक्षाचे महासचिव माने यांनी ठरविल्यानुसार गुंफाबाई मेश्राम यांची निवड केली आहे. मात्र सहा आठवड्याचा कालावधी बसपत ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालाने गुंफाबाई मेश्राम, दीपक पाटील, निर्मला बोरकर व अल्का सरदार या चार सदस्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता सहा आठवडे अजय गोंडाणे हेच कामकाज पाहतील. (प्रतिनिधी)