शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्व बालगृहाचे वास्तव्य महाविद्यालय वसतिगृहात!

By admin | Updated: December 24, 2014 22:51 IST

तपोवनला पालकत्त्व देण्यात आलेल्या अंबाचे वास्तव्य एका शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन' कायद्यांतर्गत अंबाची संपूर्ण जबाबदारी बालगृहाकडे असावी, असे अपेक्षित आहे.

नियमांचा गुंता : 'तिचे बरेवाईट झाले तर आम्ही कुणाला विचारायचे?'
गणेश देशमुख - अमरावती
तपोवनला पालकत्त्व देण्यात आलेल्या अंबाचे वास्तव्य एका शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन' कायद्यांतर्गत अंबाची संपूर्ण जबाबदारी बालगृहाकडे असावी, असे अपेक्षित आहे. आता अंबाची जबाबदारी नेमकी कुणाची हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे.
अंबा ही तपोवनात वास्तव्यास गेल्यानंतर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील काही बालगृहांमध्ये तिचे स्थानांतरण करण्यात आले होते. अंबाला नागपूरच्या बालगृहात स्थानांतरित करण्यात आल्यानंतर तेथून तिला पुन्हा अमरावतीला पाठविण्यात आले. अमरावतीला स्थानांतरित करताना तिचा प्रवेश येथील एका महाविद्यालयात करण्यात आला. हल्ली अंबा त्याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात वास्तव्याला आहे.
अंबाचे पालकत्त्व तपोवन संस्थेकडेच असल्यामुळे 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट'अंतर्गत अंबाच्या सुरक्षित आणि नियमसंगत पालनपोषणाची जबाबदारी तपोवनातील कनिष्ठ आणि वरिष्ठ बालगृहाच्याच शिरावर आहे. जबाबदारी निभवायची तर अंबाचे वास्तव्य बालगृहात नाही. वास्तव्य महाविद्यालयात असले तरी ते 'केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन अ‍ॅक्ट'ला बाध्य नाहीत. अशा स्थितीत सदर कायद्याची अंमलबजावणी अचूकपणे कशी होणार? ती कोण करणार, असा क्लिष्ट गुंता निर्माण झाला आहे.
तपोवनचे शिफारसपत्र
संबंधित महाविद्यालयाच्या जबाबदार अधिकाऱ्याशी या प्रवेशाच्या अनुषंगाने संपर्क केला असता, विदर्भ महारोगी संस्थेचे आणि पालकमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे शिफारसपत्र प्रवेशाच्यावेळी देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रवेश नियमबाह्य
अंबाचा प्रवेश त्या महाविद्यालयात करणे हे नियमबाह्य असल्याची तक्रार तिच्या मातापित्याची आहे. गैरकायद्याची मंडळी आमच्या मुलीची विक्री करण्याचा घाट घालून बसलेली आहे. त्यांच्या दहशतीमुळे ती आमच्याविरुद्ध बोलण्यासही बाध्य होते. अशा स्थितीत महाविद्यालयातून तिचे काही झाले तर आम्ही जाब विचारायचा कुणाला? मुलगी शोधायची कुठे, असे नाना प्रश्न त्यांनी उपस्थित केले.