शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री, ‘त्या ’रस्त्याचे हस्तांतरण रोखाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:01 IST

दारूविक्रीतून येणारा महसूल वाचविण्यासाठी पंचवटी ते पुढे वलगाव या राज्य महामार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा घाट राज्य शासनाने घातल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांचा आग्रह : दारुविक्रीसाठी रस्त्यांची मालकी बदलण्याचा घाट अमरावती : दारूविक्रीतून येणारा महसूल वाचविण्यासाठी पंचवटी ते पुढे वलगाव या राज्य महामार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा घाट राज्य शासनाने घातल्याची माहिती समोर आली आहे. एक संपूर्ण पिढी बरबाद करायची असेल तर या मार्गाचे हस्तांतरण पालकमंत्र्यांनी खुशाल करावे, अन्यथा हे हस्तांतरण रोखावे, अशी आग्रही अपेक्षा या भागातील लाखो नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील ३९८ दारुदुकांनाना सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचा फटका बसला आहे. सुमारे ७ कोटींचा शासनाचा महसूलही बुडाला आहे. त्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही रस्ते अवर्गीकृत करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यात पंचवटी ते पुढे वलगाव मार्गाचा समावेश असल्याची माहिती आहे. या मार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यास दारूविक्री पुन्हा बेफामपणे पूर्ववत होईल आणि पर्यायाने मद्यपींचा राजरोस धिंगाणा मुकाट्याने सहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती या मार्गावर राहणाऱ्या लाखो अमरावतीकरांना भेडसावत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या भागातील ७५ च्या संख्येत असलेल्या दारुदुकानांना टाळे लागल्यामुळे मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या लाखो नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, हे सुख अल्पजीवी ठरले. या मार्गावर असलेल्या फॉर्मसी कॉलेजची संरक्षण भिंत दारुड्यांसाठी हॉट फेव्हरेट ठरत आहे. दिवसाढवळया या रस्त्यावर अनेक ठिकाणी राजरोसपणे दारू ढोसली जाते. त्याचा त्रास महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अधिक होतो. या परिसरात सर्वाधिक शैक्षणिक संस्था आहेत. या भागातील दारू दुकानांमुळे तेथील कायदा व सुव्यवस्था पार बिघडली आहे.सोईस्कर पळवाट राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरपर्यंत मद्यविक्री करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी शनिवारपासून लागू झाल्याने मद्यसम्राटासह ‘सरकारचे धाबे दणाणले आहे. या निर्णयाने राज्य सरकारला तब्बल ७ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरावे लागले. त्यामुळे सरकारने रस्त्यांची मालकी बदलविण्याची पळवाट शोधली आहे. शहरातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काही रस्ते त्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.सर्वदूर मद्याची बाधा पंचवटीकडून वलगावकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक शाळा -महाविद्यालये आहेत. या परिसरात सर्वाधिक विद्यार्थी -विद्यार्थीनी भाड्याने राहतात. या मार्गावरील अनेक वसाहती उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जातात .तथापि या मार्गाला आता दारुड्यांचा मार्ग संबोधल्या जातो. तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी, मातोश्री विमलाबाई देशमुख, लाहोटी, डॉ.पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन महाविद्यालयासह संत गाडगेबाबा मंदिरासमोरील खुले मैदान, पोलिस स्टेशनच्या मागील बाजूने सर्रास मद्यपींचा वावर असतो. नागरी वस्त्यांमधील सर्व्हीस लाईनचा आधार घेऊन धिंगाणा घातला जात आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मद्यविक्र ीच्या दुकानासमोर उघडपणे मद्य रिचविले जाते.