लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सकल मराठा समाजाच्या युवकांनी मंगळवारी सायंकाळपासून शिवगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. गुरुवार सकाळपर्यंत याच ठिकाणी ठिय्या राहणार आहे. त्यानंतर हे सर्व युवक जिल्हा बंदच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.जिल्हा बंदच्या आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, बंद हा शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने पार पडावा, हे आवाहन करण्यासाठी ठिय्या आंदोलनाचा पर्याय निवडल्याचे या युवकांनी सांगितले. याकरिता रीतसर परवानगी मागितली; परंतु पोलीस विभागाने परवानगी नाकारली. मात्र, आम्ही शिवरायांच्या चरणी ठिय्या आंदोलन करणारच, हा निर्धार या युवकांनी व्यक्त केला. उशिरा पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावल्याची माहिती युवकांनी दिली.शिवगडावर आजपासून स्वाक्षरी अभियानशिवगडावर बुधवारी सकाळी ५ वाजतापासून सकल मराठा समाजाच्यावतीने स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता बडनेरा येथून मोटरबाइक रॅली निघेल. ती सायंकाळी ५ वाजता राजकमल चौकात दाखल होईल. या रॅलीमध्ये हे युवक सहभागी होतील. या कालावधीत समाजाचे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी ठिय्या देतील व परत रात्री युवक पूर्ववत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे युवकांनी सांगितले.आज शहरात मोटारबाईक रॅलीजिल्हा बंदच्या जागृतीसाठी व बंदचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला मोटरबाइक रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ही रॅली राजापेठवरून सुरू होईल. राजकमल चौक, जयस्तंभ, इर्विन चौक, पंचवटी, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट रोड, रामलक्ष्मण संकुल, बाबा रेस्टॉरंट, इर्विन चौक मार्गे रेल्वे स्टेशन चौकात रॅलीचा समारोप करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजबांधवांनी सांगितले.
सकल मराठा युवकांचा शिवगडावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:45 IST
सकल मराठा समाजाच्या युवकांनी मंगळवारी सायंकाळपासून शिवगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. गुरुवार सकाळपर्यंत याच ठिकाणी ठिय्या राहणार आहे. त्यानंतर हे सर्व युवक जिल्हा बंदच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सकल मराठा युवकांचा शिवगडावर ठिय्या
ठळक मुद्देगुरुवारी सकाळपर्यंत आंदोलन