शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात गुलालाऐवजी गुलाब उधळा

By admin | Updated: September 5, 2016 00:22 IST

पर्यावरण, आरोग्य व सामाजिक नुकसान करणारा गुलाल उधळण्यापेक्षा या गणेशोत्सवात गुलाबांच्या पाखळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करा,...

दत्तात्रय मंडलिक : प्रत्येक मंडळाला देणार पाच किलो गुलाब नांदगाव पेठ : पर्यावरण, आरोग्य व सामाजिक नुकसान करणारा गुलाल उधळण्यापेक्षा या गणेशोत्सवात गुलाबांच्या पाखळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करा, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. गुलालविरहित गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला पोलीस आयुक्तांच्या वतीने पाच किलो गुलाबपुष्प देण्याचीही घोषणा दत्तात्रय मंडलिक यांनी उपस्थितांसमोर केली.शनिवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शांतता समिती तसेच गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, प्रमुख अतिथी म्हणून डीसीपी शशिकुमार मीना, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील उपस्थित होते. नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर समिती सदस्य व गणेश मंडळांनी आपल्या समस्या व मत व्यक्त केले. शांततेच्या मागार्ने उत्सव साजरे केले तर भविष्यात पोलिसांची गरजच पडणार नाही. मिरवणुकीत गुलाल उधळवून नुकसान केल्यापेक्षा जर गुलाबांच्या पाकळ्या उधळल्या तर ख?्या अथार्ने समाजाला अपेक्षित असा उत्सव आपण साजरा करू शकणार असेही पोलीस आयुक्त म्हणाले. हद्दीतील जेही मंडळ यावर्षी गुलाला ऐवजी गुलाब पुष्प उधळतील त्या मंडळाला प्रत्येकी पाच किलो गुलाब पुष्प पोलीस आयुक्तांतर्फे दिली जातील व सोबतच त्या मंडळांचा सत्कारदेखील करण्यात येईल, असे मंडलिक यांनी घोषित केले. आयुक्तांच्या या उपक्रमाचे अनेक मंडळांनी स्वागत केले असून यावर्षी गुलालविरहित उत्सव साजरा करण्याचा संकल्प देखील काही मंडळांनी केला. शांतता समितीचे सदस्य शिवराजसिंग राठोड व नितीन हटवार यांनी पोलीस आयुक्तांसमोर आपल्या सूचना मांडल्या व गावातील पोलीस चौकी नियमित करण्याची मागणी केली. यानंतर एपीआय जाधव यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.