शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कार्डधारकांना १०० रुपयांचे अनुदान

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST

दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अमरावती : दारिद्र्यारेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढ्यांची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १३ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ही रक्कम ३१ मार्चपर्यंत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १,२१,८२३ अंत्योदय व १,७२,२९१ व प्राधान्य गटाचे लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपये दराने तांदूळ प्राप्त होतात. या धान्यासोबत १०० रुपये प्रतीव्यक्ती अनुदानप्राप्त होणार आहे. आता ही रक्कम एकदाच प्राप्त होणार आहे. या प्रक्रियेसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच शिधापत्रिकेचे विवरणपत्र तयार करण्याचेही काम सुरु आहे.शासनाने या योजनेच्या आराखड्यास शासनाने या योजनेच्या प्राथमिक आराखड्यास ११ डिसेंबर २०१४ मध्ये पहिला आदेश काढला. यावेळी योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्याची कालमर्यादा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ठेवण्यात आली. मात्र कालमर्यादा जास्त असल्याने कामामध्ये योग्य गती राखण्यात आली नाही. कामाला गती मिळण्यासाठी राज्याचे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी ३ फेब्रुवारी २०१५ यांनी पुरवठा विभागाला योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी ३१ मार्च २०१५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिकेचा संगणकीकृत डाटा-प्रिंटेड फॉर्म उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.