शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कचरागाड्यांना जीपीएस!

By admin | Updated: November 2, 2016 00:15 IST

शहरातील विविध वसाहतींमध्ये फिरुन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना महापालिका जीपीएस यंत्रणा बसविणार आहे.

नियंत्रण : पालिकेचा पुढाकारअमरावती : शहरातील विविध वसाहतींमध्ये फिरुन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना महापालिका जीपीएस यंत्रणा बसविणार आहे. याशिवाय सुकळी कंपोस्ट डेपोमध्ये होणाऱ्या फेऱ्यांवर नियंत्रण ठेवल्या जाणार आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी २५० टन कचरा संकलित केल्या जातो. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांची कामगार कार्यरत आहेत. महापालिका क्षेत्रातील पाचही प्रशासकीय झोनमधील कचरा संकलित करून तो कचरा डंपर आणि ट्रकद्वारे सुकळी कंपोस्ट डेपोत नेवून टाकण्याचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शन वर्धाला मिळाले आहे. या कंत्राटावर गत आठवड्यातच स्थायीने मंजुरीचे शिक्कामोर्तब केले आहे. त्याचवेळी मंजुरी प्रदान करताना शहर स्वच्छ करावे आणि कुठलीही अनियमितता होवू नये यासाठी स्थायीने काही अटी/शर्ती समाविष्ठ केल्या आहेत. शहर ते सुकळी डेपोत रोज किती ट्रक वा डंपरने कचरा वहन केल्या जात आहे, ट्रक वा डंबरमध्ये किती प्रमाणात कचरा (वजन) आहे. हे जीपीएस यंत्रणेने साध्य होणार आहे. कंत्राटदारावर नियंत्रणासोबत संभाव्य गैरव्यवहाराला जीपीएस यंत्रणेमुळे चाप बसणार आहे. याशिवाय शहरात फिरून कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना जीपीएस लागणार असल्याने या वाहनांचे शहरभराचे फिरणे नोंद होणार आहे. घंटागाडी वा कटले येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीचेही निराकरणामुळे अधिक सोपे होणार आहे. दरम्यान कचरा संकलन व वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस बसविण्याचे नियोजन असल्याने सर्वसामान्यांचा महापालिकेवरचा विश्वास वाढणार आहे. (प्रतिनिधी)अशी राहणार जीपीएस यंत्रणाजीपीएस यंत्रणेमुळे पाहिजे त्यावेळी संबंधित वाहनाचे ठिकाण समजणार आहे. शिवाय संबंधित वाहन जागीच बंद ठेवणे वा सुरू करण्याची एसएमएस सुविधा यात अपेक्षित आहे. वाहन अपेक्षित ठिकाणी पोहचल्यावर एसएमएसद्वारे संबंधितांना सूचना मिळेल. संबंधित वाहनाचा प्रवास वेग, वाहन थांबलेले ठिकाण व वेळ याबाबतची माहिती सुद्धा संकलित केल्या जाते. या सुविधेद्वारे देण्यात आलेला निर्धारित वेग संबंधित वाहनाने पार केला तर त्याचीही सूचना संबंधितांना एसएमएसद्वारे मिळेल. यामुळे कचरा संकलनासाठी निघालेले वाहन कोठे गेले व तेथून कधी आले ही माहिती प्रशासनाजवळ राहणे शक्य होईल.