शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षातच बदलला शासन निर्णय ! रुग्णांना मोजावे लागणार सुविधेनुसार पैसे, लवकरच होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:15 IST

Amravati : जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत रुग्णांना मिळणारी मोफत उपचार सुविधा ही बंद होणार असून, रुग्णांना आता आरोग्य सुविधेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत रुग्णांना मिळणारी मोफत उपचार सुविधा ही बंद होणार असून, रुग्णांना आता आरोग्य सुविधेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णयदेखील १६ जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील उपचार सुविधा ही मोफत केली होती. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री विभागीय रुग्णालय, संदर्भसेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वच प्रकारची आरोग्य सेवा ही मोफत मिळत होती. याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क हे रुग्णांना आकारण्यात येत नव्हते. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

अशातच आता शासनाने अडीच वर्षातच आपला निर्णय पुन्हा बदलला आहे. १६ जानेवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध केली आहे. यानुसार रुग्णांना आता शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आवश्यक उपचार सुविधेनुसार शासनाने ठरवलेले शुल्क भरावे लागणार आहे.

एमआरआयसाठी मोजावे लागणार १६०० रुपये

एखाद्या रुग्णाला जर एमआरआय करण्याची गरज असल्यास त्याला एमआरआयसाठी १६०० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच एक्सरे आणि सीटीस्कॅनसाठीदेखील रुग्णांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक शस्त्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या दराप्रमाणे रुग्णांनाच पैसे मोजावे लागणार आहेत.

ओपीडी नोंदणी शुल्कही लागणार

जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांत ओपीडीसाठी नोंदणी शुल्कही लागणार आहे. तर, भरती असलेल्या रुग्णाला प्रतिदिन दहा रुपये, आवश्यक रक्त चाचण्यासाठी १५ रुपये तसेच इतर सुविधांप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे.

"सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी रोजी शासननिर्णय जारी केला आहे. परंतु अजूनही अंमलबजावणी संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्या प्राप्त होताच अंमलबजावणी सुरु होईल."- डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Reverses Free Healthcare: Patients to Pay at Government Hospitals.

Web Summary : Maharashtra government reverses free healthcare policy within 2.5 years. Patients will now pay for services at government hospitals, including MRI (₹1600), X-rays, and OPD registration. The new rules are awaiting implementation guidelines.
टॅग्स :AmravatiअमरावतीMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य