शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोपालनगर : दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी 'पॉझिटिव्ह'

By admin | Updated: February 27, 2015 00:20 IST

स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

अमरावती : स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याच श्रृखंलेत गोपालनगर परिसरातील मायानगर येथे असलेल्या देशी दारु विक्री दुकानाबाबतचा अहवाल पाठवण्यिाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तीन दिवसांपूर्वी मायानगरातील आंदोलक महिलांनी जिल्हा कचेरी गाठून देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. यावेळी महिला इमारतीवर चढल्यात. पोलीस आणि आंदोलकांमध्ये तू,तू- मै-मै झाली. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून या दारु दुकानांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे कळविले आहे. त्यानुसार एक्साईजने आंदोलक संजय गव्हाळे, संजय घरडे, जनार्दन बंड, उमेश शिरसे यांना पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळविले आहे. मायानगरातील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची नियमावली आहे. या नियमावलीच्या अधीन राहूनच प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे एक्साईजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वॉर्डातील २५ टक्के महिलांचा आक्षेप असल्यास तसा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत महिलांचा सहाभाग आवश्यक असून ‘बाटली आडवी की उभी’ त्यानंतरच दारुबंदीचा निर्णय घेतला जाईल, असे या पत्रात नमूद आहे. प्रारंभी एक्साईजचे अधिकारी मायानगर परिसराचे निरीक्षण करुन या दारु दुकानाबाबत वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. जनभावनेचा आदर ठेवूनच दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात गुप्त अहवाल कळवावा लागणार असल्याने एक्साईजचे अधिकारी कामाला लागले आहेत. हे दारु विक्रीचे दुकान गोपालनगर ते एमआयडीसी मार्गावर असून परिसरात लोकवस्ती, आजुबाजुला असलेले धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय आदींची चाचपणी केली जाणार आहे. शांतता नांदावी, यासाठी हे दारु विक्रीचे दुकान बंद करणे आवश्यक आहे किंवा नाही, याची खातरजमा एक्साईजच्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मायानगरातील महिलांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पहिला टप्पा प्रशासनाने हाती घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा असून निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग किती? यावरच देशी दारु विक्रीच्या दुकानाचे भवितव्य ठरेल, हे वास्तव आहे.