आझादनगर येथे जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST2021-05-31T04:10:30+5:302021-05-31T04:10:30+5:30

अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी येथील आझादनगर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात ...

Gambling caught at Azadnagar | आझादनगर येथे जुगार पकडला

आझादनगर येथे जुगार पकडला

अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी येथील आझादनगर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपी शेख सलमान शेख सलीम (१९, रा. मांडवा झोपडपट्टी, लक्ष्मीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------------------------

विनापरवाना दारूविक्री

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगर येथे कारवाई करून विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. वेदांत विनोद मेश्राम (२४, रा. यशोदानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------------------------------------------------

दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीत दारू पकडली

अमरावती : राजापेठ पोलिसांनी दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीत कारवाई करून ६७६ रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आरोपी कैलास दशरथ सोरगे (४२, रा. दसरा मैदान ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Gambling caught at Azadnagar