शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

गाडगेनगर पोलिसांची सहा जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:12 IST

------------------ गाडगेनगर हद्दीत तिघांविरुद्ध कारवाई अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी विनामास्क रस्त्यावर आढळलेल्या तीन व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. महेश महादेवराव चौधरी ...

------------------

गाडगेनगर हद्दीत तिघांविरुद्ध कारवाई

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी विनामास्क रस्त्यावर आढळलेल्या तीन व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. महेश महादेवराव चौधरी (४७, रा. रहाटगाव रोड), मंगेश रमेश काळे (४२, रा. अशियाड कॉलनी), जिहाल संजय कुंभरे (२५) अशी त्यांची नावे आहेत. गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

-----------------

मद्याची विनापरवाना वाहतूक

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी १७ मे रोजी मेघे कॉम्प्लेक्सनजीक एम एच २७ बीव्ही २७६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून ३० हजार रुपयांची दारू जप्त केली. याशिवाय एमएच २७ बीआर ७७१० क्रमांकाच्या दुचाकीवरून विनापरवाना वाहून नेत असलेली ९०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी संकेत मोहन जुनघरे (२३, रा. विलासनगर) व ऋषीकेश प्रभाकरराव ढेंगेकर (रा. पलाश लेन), प्रसाद गजानन मांजरे (२१, रा. विनायक नगर) यांच्याविरुद्ध कलम १८८ तसेच दारूबंदी कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

-------------------

एकनाथपुरम येथे महिलेला मारण्याची धमकी

अमरावती : राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकनाथपुरम येथे ६२ वर्षीय महिलेला आदेश दयानंद जैन (४२, रा. एकनाथपुरम) याने अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. करारनामा संपला आहे. भाडे भरलेले नाही. त्यामुळे दुकान खाली करा, असे महिलेने म्हटल्यावरून ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. राजापेठ पोलिसांनी भादंविचे कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------------

रतनगंज येथून दारू जप्त

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनगंज येथून ५० वर्षीय महिलेकडून ७०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. १८ मे रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.

---------------

कुंभारवाड्यातील सलून मालकाविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचार बंदीच्या नियमांचे उल्लंघन करून कुंभारवाड्यातील सलून उघडे ठेवल्याबद्दल नीलेश प्रल्हाद काटे (३६, रा. पार्वतीनगर) याच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी भादंविचे कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला. १८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

---------------------

मटण विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

अमरावती : भातकुली रेल्वे क्रॉसिंगजवळ संचारबंदीच्या काळात मटणाची विक्री करणारा गणेश मोटुराम ढोके (४९, रा. व्यंकटेश टाऊनशिप) याच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. १८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

-----------------------

बांधकामावरील पोलाद केले लंपास

अमरावती : गौसनगर येथील सय्यद मोहसीन सय्यद हुसेन (३६) यांच्या बांधकामावरील १९ हजार रुपयांचे पोलाद अज्ञात आरोपीने १७ मेच्या रात्री लंपास केले. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------------

दुकान फोडून रक्कम पळविली

अमरावती : परकोटाच्या आत शांती मंदिर लाईन परिसरातील कन्फेक्शनरी स्टोअरचा पत्र्याचा दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने ५५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार विकासकुमार जवाहरलाल टावरानी (६५, रा. नानकनगर कॅम्प) यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दिली. १५ ते १८ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------

शेताच्या धुर्‍यावरून इसमाला मारला दगड

अमरावती : वनारसी येथे शेताच्या धुळ्याचे दगड उचलले म्हणून बुद्ध चंपत मकेश्वर याने रामधन सदाशिव मकेश्वर यांच्यावर दगड भिरकावला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. १८ मे रोजी ही घटना घडली.

-----------------

संचारबंदीचे उल्लंघन चौघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदीचे उल्लंघन करून आनंद भाऊराव नांदने (२४, रा. चक्रपाणी कॉलनी) हा एमएच २७ एव्ही १०५३ क्रमांकाच्या दुचाकीने शेगाव नाका येथे आला होता तसेच एमएच २७ बीएस ६१०६ क्रमांकाच्या दुचाकीवर दिलीप दादाराव देशमुख (६९, रा. सरस्वती कॉलनी) हे कठोरा नाका येथे आढळून आले. दोघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम १८८ सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

-------------------------

पोलिसांना पाहताच वाहन सोडून काढला पळ

अमरावती : कठोरा नाका येथे एमएच २७ - २९४० क्रमांकाच्या दुचाकीने विनामास्क फिरत असलेला युवक पोलिसांना पाहताच दुचाकी सोडून पळून गेला. मनोज ज्ञानेश्वर खंडारे (३०, रा. बेलोरा दत्त मंदिराजवळ अमरावती) असे या युवकाचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

----------------------

विनामास्क पाच जणांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संदीप रामेश्वर तायडे (२३, रा. पुसदा), तेजस श्रीकृष्ण काळे (३६, रा. नांदुरा), अनिल दिगंबरराव जुनघरे (५१, रा. हर्षराज कॉलनी), अशोक रामकृष्ण चौधरी (५५, रा. हर्षराज कॉलन), अभिषेक गजानन तायडे (रा. महात्मा फुलेनगर) यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी संचारबंदी उल्लंघनाचा गुन्हा नोंदविला. ते रस्त्यावर विनामास्क आढळून आले.

-----------------

क्षुल्लक कारणावरून उगारला चाकू

भातकुली : तालुक्यातील चेचरवाडी येथे नीलेश बाळाभाऊ देशमुख (३२) याने क्षुल्लक कारणावरून वाद घालून ४५ वर्षीय महिलेवर चाकू उगारला. तिचा मुलगा रूपेश देशमुख याने त्याला घरी जाण्यास सांगितले तेव्हा तो चाकू घेऊन त्याच्यामागे लागला. महिला चाकू पकडण्यासाठी गेली असता, तिच्या डाव्या हाताला लागून जखम झाली. मारण्याची धमकी देऊन नीलेश तेथून पळून गेला. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------

भातकुलीत इसमाविरुद्ध गुन्हा

भातकुली : तोंडाला रुमाल वा मास्क न बांधता सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या विलास निगोटराव चेचरे (५०, रा. सायत) याच्याविरुद्ध भातकुली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. १७ मे रोजी ही भातकुली येथे कारवाई करण्यात आली.

-----------------

वल्लभनगर येथे महिलेचा विनयभंग

अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वल्लभनगर येथे ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. ती घरात स्वयंपाक करीत असताना मयूर चाळीसगावकर (३२) हा घरात शिरला व शारीरिक लगट केली. महिलेच्या पतीला त्याने चाकू उगारून जखमी केले व दोघांनाही शिवीगाळ केली. खोलापुरी गेट पोलिसांनी भादविचे कलम ३५४, ५०४ अन्वये १७ मे रोजी गुन्हा दाखल केला.

----------------

खालकोनी येथील युवकाविरुद्ध गुन्हा

भातकुली : तोंडाला रुमाल वा मास्क न बांधता सार्वजनिक ठिकाणी वावर केल्याबद्दल खालकोनी येथील श्याम रामाजी खर्चान या युवकाविरुद्ध भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंदविला. १७ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------------

राजापेठ हद्दीतून दुचाकी लंपास

अमरावती : गायत्रीनगर येथील कपिल रमेश राऊत (३७) यांनी सुशीलनगर नाल्याजवळ उभी केलेली एमएच २७ एएच ७५३३ क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने पळवून नेली. १५ मे रोजी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी १७ मे रोजी गुन्हा नोंदवला.

----------------

जेवड नगर येथे युवकाला मारहाण

अमरावती : जेवडनगर येथे धीरज संतोष पिकलमुंडे या युवकाला दोघांनी काठ्यांनी मारहाण केली. धीरजचा धीरज किसन कुंटसंखे याच्याशी वाद झाला होता. त्यामुळे भगवान बबन सोळंके व गोपाल बबन सोळंके या त्याच्या मित्रांनी धीरज पिकलमुंडेवर हल्ला चढविला. तो जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. राजापेठ पोलिसांनी सोळंके बंधूविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

शिराळा येथे मटण विक्रीवरून गुन्हा

वलगाव : नजीकच्या शिराळा येथे संचारबंदी कालावधीत विनामास्क मटण विक्री करीत असलेला विलास भाऊराव लोणारे (४०) याच्याविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. १७ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

-----------------

बीएमडब्ल्यूला धडकली ऑटोरिक्षा

अमरावती : बॉम्बे फैल चौकात एमएच २७ सीटी ९०९९ क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारला विलासनगरकडून येणाऱ्या एमएच २७ बीडब्ल्यू ५५७३ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने एका बाजूने धडक दिली. याप्रकरणी हेमंत शंकरराव जाधव (५१, रा. कॅम्प) यांनी शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संतोष मधुकर निकम (४०, रा. कुणाल कॉलनी) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. १७ मे रोजी सायंकाळी घडलेल्या या अपघातात ऑटोरिक्षाचालक जखमी झाला आहे.