शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासरथात निधीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 23:53 IST

जकात नाका बंद केला. एलबीटीही बंद झाली. आता मदार आहे ती केवळ मालमत्ताकरावर. तोही तुटपुंजा. उत्पन्नाचे नवे स्त्रोत नाहीत.

प्रदीप भाकरे अमरावतीजकात नाका बंद केला. एलबीटीही बंद झाली. आता मदार आहे ती केवळ मालमत्ताकरावर. तोही तुटपुंजा. उत्पन्नाचे नवे स्त्रोत नाहीत. विदर्भ विकास महामंडळही निधीच्या नावाने हात वर करते. अशा परिस्थितीत महापालिकेची आर्थिक नाडी आवळल्या गेली आहे. महापालिकेचा विकासरथ आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असताना शासनानेही हात आखडता घेतल्याने यंत्रणेची दमछाक होत आहे. जकात नाका आणि एलबीटी बंदचा निर्णय झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमरावतीसारख्या ‘ड’ वर्गिय महापालिकेला बसला. मालमत्ताकर, नगररचना विभाग आणि बाजार परवाना विभागातील अल्प उत्पन्नावर पालिकेचा गाडा चालविण्याची जबाबदारी घटकप्रमुखांवर आली. वर्षाकाठी एलबीटीचे उत्पन्न ११० कोटींहून अधिक होणे अपेक्षित असताना सानुग्रह अनुदान म्हणून शासन महापालिकेला महिन्याकाठी केवळ ७ कोटी रूपये देत असल्याने महापालिकेच्या आर्थिक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. थकीत अनुदानाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आर्थिक व्याप सांभाळताना यंत्रणेची गोची होत आहे. पाठपुरावा करुनही अनुदान देण्याचा मुहूर्त शासनाला मिळालेला नाही. सन १९९७-९८ पासून तब्बल ४७.६४ कोटी रूपये राज्य शासनाकडून अप्राप्त आहेत. यात रस्ते अनुदान, माध्यमिक शाळा सेवानिवृत्त शिक्षण अनुदान, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ कर्ज साफसफाई अनुदान,जकात वसुली बंद असल्याने नुकसानभरपाई अनुदान, बिन शेतसारा व जमीन महसूल अनुदान व करमणूककर शिर्षाखाली अनुदान अप्राप्त असल्याने हा आकडा तब्बल ४७ कोटी ६४ लाख ७६६२ रूपयांवर पोहोचला आहे. अकोली वळण रस्ता भूसंपादनासाठी आवश्यक २० कोटींचा निधी अप्राप्त असल्याने पालिका यंत्रणेची पंचाईत झाली आहे.जकात बंद केल्याने पालिकेची यंत्रणा कोलमडली. ४७ कोटींसाठी पालकमंत्री, लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठपुरावा गरजेचा आहे. - प्रदीप बाजडनगरसेवक, महापालिका अनुदान मिळविण्यासाठी सचिवस्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल. निधीसाठी यंत्रणेचे जोरकस प्रयत्न सुरु आहेत. - हेमंत पवार,आयुक्त