शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

तीन घरांसह चार गोठे खाक

By admin | Updated: May 22, 2016 00:03 IST

अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली.

वासनी येथील घटना : तीन बकऱ्या ठार, गाय-वासरु होरपळलेपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली. आगीत तीन बकऱ्या होरपळून मृत पावल्या. काही बकऱ्या वासरू व गाय हे पाळीव जनावरे जखमी झाले. विद्युत खांबावरून आगगोळे पडल्याने आग लागल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सुनील श्रीकृष्ण विजारे, सुमित्रा विश्वनाथ बिजारे, दिनेश गंगाधर ठाकरे यांच्या घरांची आगीत राखरांगोळी झाली. सुनिता बिजारे यांच्या तीन बकऱ्या गोठ्यात जळून ठार झाल्या. सुभाष अंबादास ठाकरे, प्रकाश गंगाधर ठाकरे, मुरलीधर ठाकरे आदींचे गोठे जळून राख झाले. वीज वितरण कंपनीमुळे आग परतवाडा : या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. आग लागताच अचलपूर व चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. तीन बंबांनी आग विझविण्यात आली. वासणी बु. येथे शनिवारी लागलेली आग विज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे लागल्याचे सांगण्यात आले. सुनीता बिजारेंच्या घराशेजारील विज खांबावरुन दुपारी विद्युत तारांच्या घर्षणाने आगीचे गोळे खाली पडले. गोठ्याला आग लागताच हवेने घरांसह गोठ्यांना कवेत घेतले. आग लागताच गावात एकच हाहाकर माजला होता. विद्युत कंपनीचे तार जमिनीवर लोंबकळत असताना त्यावर दुर्लक्ष कोल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर, रामगुंडे, राजेश व्यवहारे, विजय गिरी, सोनार महसूल अधिकाऱ्यांनी तत्काल भेट देवून माहिती घेतली. (प्रतिनिधी)