सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्रींना अमरावती विद्यापीठाचे डी.लिट.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:29 IST2026-02-21T17:28:20+5:302026-02-21T17:29:36+5:30

Amravati : बिहार, सिक्कीम व केरळचे माजी राज्यपाल तथा रिपाइंचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वाेच्च पदवी मिळविली आहे.

Former Supreme Court Justice Bhushan Gavai's mother is a D.Litt. from Amravati University. | सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्रींना अमरावती विद्यापीठाचे डी.लिट.

Former Supreme Court Justice Bhushan Gavai's mother is a D.Litt. from Amravati University.

अमरावती : बिहार, सिक्कीम व केरळचे माजी राज्यपाल तथा रिपाइंचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वाेच्च पदवी मिळविली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून दिली.

कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या माहितीनुसार सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षान्त समारंभात डॉ. कमलताई गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेतंर्गत राज्यशास्त्र विषयात वाङ्मय पंडित (डी.लिट) या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी भारतीय सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते ही पदवी सन्मानित केली जाणार आहे. डॉ. कमलताई गवई या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांची मातोश्री आहेत. अमरावती विद्यापीठातून यापूर्वी डॉ. किशाेर अढाव, डॉ. संतोष ठाकरे आणि आता माजी लेडी गर्व्हनर डॉ. कमलताई गवई यांनी संशोधनात्मक डी.लिट मिळविण्याचा बहुमान मिळाला आहे. तसेच यापूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्यश्री शंकरबाबा पापळकर यांना अमरावती विद्यापीठाने मानद डी.लिटने सन्मानित केले आहे.

डॉ. कमलताई यांचे विपश्यना, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान

अमरावतीनजीकच्या मोगरा येथे डॉ. कमलताई गवई यांच्या अथक परिश्रमातून विपश्यना केंद्र साकारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विशेष विपश्यना शिबिर, ध्यानसाधना निरंतरपणे सुरू आहे. डॉ. कमलताई या वृक्षप्रेमी असून, त्यांनी या विपश्यना केंद्राचा
परिसर हिरवळमय केला आहे. मुलाबाळांप्रमाणे त्या झाडाची निगा राखतात. म्हणून हे विपश्यना केंद्र विविध झाडे, वृक्ष आणि फुलझाडांची नटलेला दिसून येतो. तसेच या ठिकाणी सामाजिक कार्य सतत सुरू असते. डॉ. कमलताई गवई यांनी अमरावतीच्या तक्षशीला महाविद्यालयाचे प्राचार्यपद समर्थपणे हाताळले आहे. सामाजिक, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे अतुलनीय कार्य आहे.

Web Title : जस्टिस भूषण गवई की मां, कमलताई गवई को अमरावती विश्वविद्यालय द्वारा डी.लिट से सम्मानित।

Web Summary : जस्टिस भूषण गवई की मां, कमलताई गवई को अमरावती विश्वविद्यालय द्वारा राजनीति विज्ञान में उनके शोध के लिए डी.लिट से सम्मानित किया जाएगा। यह पुरस्कार उनके सामाजिक और शैक्षणिक योगदान को मान्यता देता है, जिसमें एक विपश्यना केंद्र की स्थापना भी शामिल है। जनरल मनोज पांडे पुरस्कार प्रदान करेंगे।

Web Title : Justice Bhushan Gavai's mother, Kamaltai Gavai, awarded D.Litt by Amravati University.

Web Summary : Kamaltai Gavai, mother of Justice Bhushan Gavai, will be honored with a D.Litt. by Amravati University for her research in political science. The award recognizes her social and educational contributions, including establishing a Vipassana center. General Manoj Pande will present the award.