शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन सहायक आयुक्तांना सक्तीची स्वेच्छानिवृत्ती

By admin | Updated: March 3, 2017 00:17 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना स्वअधिकारात शिक्षणकर व रोजगार हमी करात सवलत देणाऱ्या तत्कालिन सहायक आयुक्त आर.बी.ओगले यांच्यासाठी

गुडेवारांचा निर्णय कायम : नगरविकासकडून ‘तो’ प्रस्ताव विखंडितअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना स्वअधिकारात शिक्षणकर व रोजगार हमी करात सवलत देणाऱ्या तत्कालिन सहायक आयुक्त आर.बी.ओगले यांच्यासाठी महापालिकेचे दार कायमस्वरुपी बंद झाले आहे. नगरविकास विभागाने १ मार्च रोजी ओगले यांच्या संदर्भात निर्णय दिल्याने महापालिकेत परतण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तत्कालिन प्रशासनाने ओगले यांच्याबाबत घेतलेला सक्तीच्या स्वेच्छानिवृत्तीच्या शिक्षेचा निर्णय नगरविकास खात्याने कायम ठेवला आहे. सहायक आयुक्त आर.बी.ओगले यांना महापालिकेच्या सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात यावे, या शिक्षेस सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव विषय क्र. ३० अन्वये तत्कालिन प्रशासनाने आमसभेसमोर ठेवला होता. १९ मार्च २०१६ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून प्रशासनाने त्यांचेवर ही कारवाई न करता परत कामावर रूजू करुन घ्यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर व कायम करण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने पारित केलेला हा ठराव विखंडित करण्यात यावा, असे पत्र तत्कालीन आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठविले. त्यानंतर १३ जुलै २०१६ ला हा ठराव तात्पुरता निलंबित करण्यात आला व शासनाने याठरावाप्रकरणी आयुक्त आणि महापालिकेला अभिवेदन मागितले. असे आहे प्रकरणओगले हे झोन क्र. ३ मध्ये कार्यरत असताना त्यांनी विनापरवानगी स्वत:च्या अधिकारात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना शिक्षण व रोजगार हमीकरात नियमबाह्य सवलत दिली होती. विभागीय चौकशीदरम्यान त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई व सक्तीने सेवानिवृत्ती ही शिक्षा प्रशासनाने ठरविली होती. गुरूवारी नगरविकासने त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याबाबतचा प्रस्ताव अंतिमत: विखंडित केल्याने ती शिक्षा लागू झाली.असा आहे शासन निर्णयअमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित केलेला ठराव क्र. ३०- १९ मार्च २०१६ महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय शिस्तीच्या विरोधात असल्याने हा ठराव महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडित झाल्याचे मानण्यात येत आहे.