शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भरावाचा मुख्य कालवा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 01:06 IST

घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला प्रतीक्षा मुठेच्या पुनरावृत्तीची ! : उर्ध्व वर्धाच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे. तिवसानजीक मुख्य कालव्याच्या ४० किमी अंतरात सरळ विमोचकाचे गेट खराब झाले आहे. याच ठिकाणी तळेगाव ठाकूर येथे जाणारा विमोचक गाळाने ओव्हरटॅप होत असल्याने, येथीलच कालव्यावरील गेट खराब झाल्याने व मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणातून पाझर फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे भरावाचा कालवाच धोक्यात आला आहे.यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने कपाशी, तूर व हरभऱ्याच्या पेरणीसाठी फक्त दोन पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सध्या १८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात पाण्याची पहिली पाळी सोडण्यात आली. त्यामुळे किमी ४० मधील सरळ विमोचकाची स्थिती उघडकीस आली. या ठिकाणचा स्टेमरॉड खराब झाल्याने गेटदेखील बंद होत नाही. परिणामी कालव्याचे पाणी लगतच्या परिसरात वाहत आहे. दररोज लाखो लिटर पाण्याने परिसरातील तीन ठिकाणी तलाव तयार झाला आहे. हीच स्थिती तळेगाव ठाकूर विमोचकाची आहे. मायनर गाळाने बुजल्याने पाणी ओव्हरटॅप होऊन बाजूला पसरले. विशेष म्हणजे, कालव्याच्या अस्तरीकरणाच्या जॉइंटमध्ये झुडुपे उगवली आहेत व याच भेगांमधूनही पाणी पाझरत असल्याने मुख्य कालवाच धोक्यात आला आहे. कोट्यवधी लिटर पाणी या ठिकाणी साचले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिसरातील पिके खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाझरभराव्याच्या कालव्याला अस्तरीकरण केले असले तरी भेगांमधून व भगदाडांमधून पाणी जर पाझरत असेल, तर ग्रेडेशनवर परिणाम होतो. कालव्याच्या तळाच्या उतारावर गाळ साचतो व या ठिकाणी गवत व झाडे उगवतात व यामुळे भरावाला धोका निर्माण होतो, अशी माहिती सिंचन क्षेत्रातील एका अभियंत्याने दिली. उजव्या मुख्य कालव्यावर अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याने व हा कालवादेखील भरावाचाच असल्याने भविष्यात धोका असल्याचे सत्य नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.पाण्यात कपात; अपव्ययात लाखो लिटरऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ४१ टक्केच पाणीसाठा आहे. यामध्ये किमान पाच टक्के जरी मृत साठा गृहीत धरला तरी ३६ टक्केच साठा आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी एका पाळीत सात टक्के पाणीसाठा कमी होतो. आता आणखी एक पाळी तीन आठवड्यांनी देण्यात येणार आहे. म्हणजेच २९ टक्केच साठा प्रकल्पात शिल्लक राहील. त्यामध्येही, बाष्पीभवन, औद्योगिक व शहरी वापरासाठी पाणी वापरले जाणार आहे. पाणी कपातीसाठी अमरावती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे अन् सिंचन विभागाच्या बेपर्वाईने रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Waterपाणी