शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘शैलेंद्र चाट भंडार’च्या समोशात मांसाचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 00:29 IST

गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या ग्राहकाच्या समोस्यामध्ये चक्क

अमरावती : गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या ग्राहकाच्या समोस्यामध्ये चक्क मटणाचा अर्धवट खाल्लेला तुकडा आढळला. यामुळे संतप्त ग्राहकाने दुकानात गोंधळ घातला. याप्रकाराची तक्रार ग्राहकाने एफडीएकडे केली आहे. ही घटना गुरूवार २९ डिसेंबर रोजी घडली. नागपूरचे मूळ रहिवासी व स्थानिक चक्रधर एजन्सीमध्ये नोकरी करणारे संदीप तिडके हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह गुरूवारी सकाळी ११ वाजता गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये पोहोचले. त्यांनी एक प्लेट समोसा बनवून मागितला. एक-दोन घास खाल्ल्यानंतर त्यांना समोस्यात मटणाचा तुकडा आढळला. गुरूवारी मांसाहार निषिद्ध मानणारे संदीप तिडके यांचा संताप यामुळे अनावर झाला. त्यांनी दुकानाचे संचालक सुधीर मंगरोरिया यांच्यासह इतर ग्राहकांना तो तुकडा दाखविला. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. खाद्यान्नांची विश्वासार्हता चव्हाट्यावर रघुवीरच्या कचोरीत तळलेली अळी आढळली होती. त्यानंतर मनभरीच्या चिवड्यात तर चक्क तळलेली अख्खी पालच आढळली होती. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटना जुन्या होत नाहीत तोच कचोरीत गुटख्याचे पाऊच आढळले होते. त्यानंतर अगदी कालपरवा म्हणजे मंगळवारी सिलबंद भेळेच्या पाकिटात तळलेले पाच ते सहा झुरळ आढळले. या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा शैलेंद्र चाट भंडारच्या समोस्यात मटणाचा तुकडा आढळल्याने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांची विश्वासार्हता चव्हाट्यावर आली आहे. २० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोेत. कुटुंबाची धार्मिक पार्श्वभूमी असल्याने मांसाहार निषिद्ध मानतो. मग, ग्राहकांना ते कसे खाऊ घालणार. समोस्यात मांसाचा तुकडा कसा आढळला, याबाबत आम्ही स्वत:च अचंबित झालो आहोत. -सुधीर मंगरोरिया, संचालक, शैलेंद्र चाट भंडार मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारी व्यस्तता होती. शुक्रवारी शैलेंद्र चाट भंडारला भेट देऊन अधिकारी चौकशी करतील. -जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्नप्रशासन