बदनामी करण्याची भीती दाखवून १६ वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी केला सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:59 IST2026-02-11T17:57:24+5:302026-02-11T17:59:13+5:30

चांदूर रेल्वे हादरले : बदनामी करण्याची भीती दाखवून प्रस्थापित केले शरीरसंबंध, दोन आरोपींना अटक, तिघांचा शोध सुरू

Five men gang-raped a 16-year-old girl, fearing defamation | बदनामी करण्याची भीती दाखवून १६ वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी केला सामूहिक अत्याचार

Five men gang-rape 16-year-old girl for fear of defamation

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे/अमरावती :
चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळेतून घरी परतणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देऊन पाच नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली असून, पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध ९ फेबतारी रोजी रात्री पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, तिघांचा शोध सुरू आहे.

पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना, साईनाथ (१८) आणि अजिंक्य (१८) यांनी तिला मुलांसोबत तुझे लफडे आहे, आम्ही तुझी बदनामी करू, अशी धमकी दिली. त्यानंतर, तिला विरूळ रोंघे मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यातर अत्याचार केला यानंतर कार्तिक गजानन शेलोकार, साहील (१८) आणि संकेत विनोद काळे (२२) या तिघांनीही पीडितेचे तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. स्त्रीशरीराला चटावलेल्या या पाच जणांनी तिचे जगणे नकोसे करून टाकले होते.

पोलिस उपनिरीक्षक वीणा पांडे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध अत्याचार, पॉक्सो व अॅट्रॉसिटी अन्वये पोलिसांनी गन्दा दाखल केला आहे. 

सात महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

बदनामीची भीती घालून जाळ्यात ओढल्यानंतर अत्याचाराचा हा प्रकार ७ जुलै २०२५ ते ६ फेब्रुवारी २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत घडला. डॉक्टरांनी तपासणीअंती, ती अल्पवयीन तीन महिन्यांची गर्भवती आहे.

पाच जणांवर गुन्हा; दोन आरोपी जेरबंद

पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. ९ फेब्रुवारी रोजी रात्री १०:५१ वाजता पोलिसांनी कार्तिक गजानन शेलोकार (२१) आणि संकेत विनोद काळे (२२) या दोन आरोपींना अटक केली. गुन्हा दाखल झालेल्या उर्वरित आरोपींमध्ये साईनाथ (१८), अजिंक्य (१८), साहील (१८) यांचा समावेश आहे. पोलिस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
 

Web Title : चांदूर रेलवे में ब्लैकमेल के बाद 16 वर्षीय लड़की से सामूहिक बलात्कार, पांच गिरफ्तार

Web Summary : चांदूर रेलवे में, पांच लोगों ने एक 16 वर्षीय लड़की को बदनाम करने की धमकी देकर उसके साथ सामूहिक बलात्कार किया। पीड़िता तीन महीने की गर्भवती है। पुलिस ने POCSO और अत्याचार अधिनियम के तहत दो संदिग्धों को गिरफ्तार किया, जबकि अन्य तीन साथियों की तलाश जारी है। हमले सात महीने तक चले।

Web Title : Five arrested for gang-raping 16-year-old after blackmail in Chandur Railway

Web Summary : In Chandur Railway, five men gang-raped a 16-year-old after threatening to defame her. The victim is three months pregnant. Police arrested two suspects under POCSO and Atrocity Act, while search continues for the other three accomplices. The assaults occurred over seven months.