शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांचा पाडस वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात

By admin | Updated: September 6, 2016 00:13 IST

हरणाच्या कळपातून ताटातूट झाल्यानंतर पाच दिवसांच्या पाडसाला (हरिणाचे पिलू) एका शेळी चारणाऱ्या महिलेच्या समयचुकतेने सोमवारी जीवदान मिळाले.

हरिणाचा शोध सुरु : शेळ्या चारणाऱ्या महिलेने दिले जीवदानपोहरा बंदी : हरणाच्या कळपातून ताटातूट झाल्यानंतर पाच दिवसांच्या पाडसाला (हरिणाचे पिलू) एका शेळी चारणाऱ्या महिलेच्या समयचुकतेने सोमवारी जीवदान मिळाले. पाडस वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात असून त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत देखरख केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, पोहरा वन वर्तुळातंर्गत येणाऱ्या पिंपळखुटा बिटमध्ये पाच दिवसांचे पाडस हे हरिणाच्या कळपातून भटकले. पिंपळखुटा येथील शेळ्या चारणाऱ्या राधाबाई मेश्राम यांना हे पाडस शेळ्यांच्या कळपात दिसून आले. छोटे पिलू असल्याने ते शेळी नाही हे लक्षात येताच त्याला आश्रय देण्यात आला. राधाबाई मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ही बाब वनकर्मचाऱ्यांना कळविली. त्यानंतर पोहऱ्याचे वनपाल विनादे कोहळे, वनरक्षक व्ही. बी. देशमुख, एम. सी. ठाकूर, अरुण महाजन हे घटनास्थळी पोहचले. पाडस हे सुखरुप असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सदर पाडस हे पोहरा येथील विश्रामगृहात आणण्यात आले. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात पाडसाला दुध पाजून त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. पाडस हे पाच दिवसाचे असून ते सध्या धावू शकत नाही. त्यामुळे कोणत्या हरणाच्या कळपातून हे पाडस भटकले याचा शोध घेतला जात आहे. पोहरा वनवर्तुळात मोठ्या प्रमाणात हरिणाचे कळप आहेत. वनकर्मचाऱ्यांनी हरिणापासून विभक्त झालेल्या पाडसाला त्याची आई मिळावी, यासाठी हरिणांच्या कळपाचा युद्धस्तरावर शोध सुरू केला आहे. पाडस कळपातून दूर झाल्यामुळे ते शिकारी अथवा कुत्र्याच्या तावडीत सापडले नाही. अन्यथा या पाडसाला कुत्र्यांनी लचके तोडून ठार मारले असते. परंतु शेळ्या चारणाऱ्या महिलेच्या समयसुचकतेने पाच दिवसाच्या पाडसला जीवदान मिळाले आहे, हे विशेष. (वार्ताहर)