शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आधी लग्नाच्या आणाभाका दिल्या, प्रेमात ओढून केले लैंगिक शोषण; नकार देत दिली आत्महत्येची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:50 IST

Amravati : शहर आयुक्तालयात जानेवारी ते २३ डिसेंबरपर्यत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल ५० एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील अनेक एफआयआर हे शून्य एफआयआर म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील एका २५ वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने 'तो मी नव्हेच' चा पवित्रा घेतला. तथा आत्महत्या करण्याची धमकी दिली. जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ती लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी २३ डिसेंबर रा. कठोरा नाका रोड, अमरावती) रोजी आरोपी हरीश सुरेंद्र झारखंडे (२४, याचेविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी हरीश झारखंडे याने महेंद्र कॉलनी भागातील त्या २५ वर्षीय तरुणीला प्रेम जाळ्यात ओढले. तिला वेळोवेळी लग्नाचे प्रलोभन दिले. तिला आणाभाका दिल्या. पुढे जुलै २०२४ ते लग्नाच्या नोव्हेंबर २०२५ या दीड वर्षाच्या कालावधीत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचेसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर तिने लग्नाचा तगादा लावला असता त्याने साफ नकार देऊन मी लग्न करू शकत नाही, असे तिला बजावले. तू माझी फसवणूक केली आहे, त्यामुळे मी पोलिसांत तक्रार देते, असे तिने बजावले. त्यावर आरोपीने तू तसे केल्यास मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, असे म्हणत आत्महत्येची धमकी दिली. अखेर त्या तरुणीने २३ डिसेंबर रोजी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली.

अत्याचाराची पन्नासी

शहर आयुक्तालयात जानेवारी ते २३ डिसेंबरपर्यत लैंगिक अत्याचाराबाबतचे तब्बल ५० एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील अनेक एफआयआर हे शून्य एफआयआर म्हणून येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले. ते घटनास्थळ असलेल्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. गतवर्षी याच कालावधीत तो आकडा ४९ असा होता. तर यंदा शहर आयुक्तालयात विनयभंगाचे तब्बल १७८ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षी याच कालावधीत ती संख्या १४० अशी होती.

अल्पवयीन मुली टार्गेट, सोशल मीडियाही कारण

अत्याचाराच्या ज्या ५० प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आले. त्यातील ५० ते ६० टक्के पिडिता या अल्पवयीन आहेत. सोशल मिडियाचा अतिवापर व अतिरेकदेखील त्या घटनांना कारणीभूत ठरला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : False Promises, Sexual Abuse, Suicide Threats: Woman Files Complaint

Web Summary : A 25-year-old woman in Amravati was sexually abused after being lured with marriage promises. When she pressed for marriage, the accused refused and threatened suicide. Police have registered a case. 50 FIRs of sexual assault registered this year, many victims are minors.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावती