शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

१८ हजार ‘फ्रंट लाईन’ वर्कर्सना सर्वप्रथम कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 5:00 AM

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेत शासकीय व खासगी स्तरावरील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ची माहिती ३१ ऑक्टोबरच्या आत मागितली आहे.

ठळक मुद्देप्रशासनस्तरावर जोरकस तयारी : ३१ ऑक्टोबरच्या आत डेटाबेस तयार, कोल्ड स्टोअरेजही होणार

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाशी सर्वांत पुढच्या फळीत लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कोरोनाची लस मिळणार आहे. या ‘फ्रंट लाईन वर्कर्स’चा डेटा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या शासकीय व खासगी अशा एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांची माहिती ३१ तारखेच्या आत शासनाला पाठविण्यात येणार आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेत शासकीय व खासगी स्तरावरील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ची माहिती ३१ ऑक्टोबरच्या आत मागितली आहे. या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य यंत्रणा कामी लागली असून, अधिनस्थ यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच आयएमए व तत्सम संघटनेशी संलग्न यंत्रतेतील सर्व व्यक्तींच्या माहिती संकलन करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे लशींचा साठा ठेवण्यासाठी  कोल्ड स्टोअरेज, लसीकरण करण्यासाठीचे केंद्र आदी तयारी या निमित्ताने सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाद्वारे २३ ऑक्टोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र देऊन या मोहिमेची माहिती व महत्त्व विशद केले आहे. प्रत्येक जिल्ह्याची काय तयारी सुरू आहे, यासाठी प्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे आढावादेखील घेतला. यांचा पहिल्या मोहिमेत समावेशएएनएम, एमपीडब्लू, आशा, आशा पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, हेल्थ सुपरव्हायझर व सुपरव्हायझर, आयुष, अलोपॅथी डॉक्टर्स, डेंटिस्ट, मेडिकल, नर्सिंग, पॅरामेडिकल आणि इतर विद्यार्थी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिस्ट, टेक्निशियन, आरोग्य यंत्रणेतील ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार,  क्लरिकल व प्रशासकीय स्टाफ यांची वर्गवारी करण्यात येऊन त्यांच्या सविस्तर माहिती त्यामध्ये भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

प्रतिबंधासाठी ‘लाईव्ह अटेन्यूएटेड व्हॅक्सीन’

कोरोना प्रतिबंधासाठी जी लस उपलब्ध होणार आहे, ती ‘लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सीन (जिवंत लस) या प्रकारातील असल्याचे सांगण्यात आले. ती कोठून उपलब्ध होणार, याविषयी आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. कोरोनावरील लस भारतात २०२१ च्या सुरुवातीला उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेले आहे. भारतात दोन लशींच्या मानवी चाचण्या सुरू झालेल्या आहेत, तर रशियानिर्मित लशीच्या चाचण्यादेखील देशात लवकरच सुरू होतील. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या