शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोहऱ्याच्या १० हेक्टर जंगलाला वणव्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:23 IST

अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

वन्यजीव बचावले : खोडसाळपणे आग लावल्याचा संशय, तीव्र हवेमुळे भडकलीअमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. तीव्र हवेमुळे आगीने वेग घेतला होता. ही आग कोणीतरी खोडसाळपणाने लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तब्बल दीड तासांच्या महत्प्रयासाने आग आटोक्यात आली. मात्र या आगीत कोणतेही वन्यजीवांना हानी पोहोचली नाही, हे विशेष.उन्हाळा सुरू झाला की, जंगलात वणव्याच्या घटना घडतात. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने सॅटेलाईटचा वापर सुरू केला आहे. गत काही दिवसांपूर्वी वडाळी जंगलात आगीची किरकोळ घटना घडली होती. मात्र चांदूररेल्वे मार्ग सतत वर्दळीचा असल्याने पोहरा जंगलात टॉवरनजीक रस्त्यावर कुणीतरी सिगारेट, विडी ओढल्यानंतर धुटुक फेकल्याने आग लागली असावी. अथवा कुणीतरी खोडसाळपणे जंगलास आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाचा आहे. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा जंगलात तीव्र वारे वाहत होते. त्यामुळे आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रणासाठी वनविभाग, अग्निशमन, पोलीस विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. सर्व यंत्रणांनी आपआपल्या परिने आग रोखली. परंतु तीव्र हवेमुळे सुमारे १० हेक्टर परिसराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही अग्निशमन बंबाद्वारे विझविण्यात आली. वनखंड क्रमांक ७८ अंतर्गत उत्तर चोरआंबा बीटमध्ये ही आग लागली होती. वनपाल विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करून वनविभागाने तपास चालविला आहे. आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीनचा वापर केला होता. यात वनपाल विनोद कोहळे, वनरक्षक नितीन नेतनवार, पी.जी. शेंडे, शेख अनिस, नीलेश करवाडे, दिलीप काळबांडे, किशोर धोटे, छत्रपती वानखडे, दीपक नेवारे, बाबाराव पळस्कर आदींनी आग नियंत्रणात आणणयासाठी मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)सॅटेलाईटवर झळकली आगपोहरा जंगलात गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती सॅटेलाईटवर झळकली होती. त्यानंतर त्वरेने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी सूत्रे हलविली. पोहरा वनविभागाची चमू काही वेळेतच घटनास्थळी पोहोचली. मात्र वेगवान हवेमुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास पाण्याचा मारा करावा लागला. आता जंगलात आग लागल्यास नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे वनाधिकाऱ्यांना कोणत्या भागात आग लागली हे दिसून येते.