शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर फिरदौसला मदरशातूनच अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:01 IST

फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच्या कपड्यांसह घटनास्थळावरील बेडशीट जप्त केली.

ठळक मुद्देकाठीसह बेडशीट, कपडे जप्त : मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या महिलेचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवासी मदरशातील पीडित १५ वर्षीय मुलीला संस्थाध्यक्ष आरोपी जियाउल्ला खानच्या स्वाधीन करणारी महिला फिरदौस हिला अटक करण्यात अखेर नागपुरी गेट पोलिसांना शनिवारी रात्री यश मिळाले. फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच्या कपड्यांसह घटनास्थळावरील बेडशीट जप्त केली.लालखडी परिसरातील या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ झाली. पोलिसांकडून त्याची कोठडीत कसून चौकशी केली जात आहे. जियाउल्लाची सहकारी असलेली फिरदौस पसार झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम अचलपूर गाठले. त्यानंतर ती मध्यप्रदेशातील रतलामला गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांचे पथक तेथे पोहोचताच फिरदौस पुन्हा पसार झाली. त्यानंतर नेरपिंगळाई व अंजनगावला ती गेल्याची माहिती हाती लागली. पोलीस फिरदौसचा माग घेतच होते. शनिवारी रात्री ती लालखडी स्थित मदरशात पोहोचल्याची माहिती हाती आली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने मदरशात पोहोचून फिरदौसला अटक केली. ती तिन महिन्यांपूर्वी मदरशात शिक्षक व मदतनीस म्हणून रुजू झाली होती. जियाउल्ला खानच्या ती निकट होती. तिच्याच माध्यमातून जियाउल्ला खानने पीडित मुलीला खोलीत नेले.मदरशातील अन्य मुलींवर लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे, ही बाब फिरदौसच्या चौकशीनंतर उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक सुलभा राऊत व प्रशांत लभाने यांचे पथक या प्रकरणाच्या तपासकामी गुंतले आहेत.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा