शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

वाघाच्या शिकारीसंदर्भात गुन्हे दाखल; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 7:45 PM

वाघाच्या शिकारीसह वन्यजीवांच्या हत्त्येसंदर्भात पूर्व मेळघाट वनविभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आपआपल्या दफ्तरी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : वाघाच्या शिकारीसह वन्यजीवांच्या हत्त्येसंदर्भात पूर्व मेळघाट वनविभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आपआपल्या दफ्तरी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यात वाघ, बिबट, बायसनसह (रानगवा) अन्य वन्यजीवांच्या शिकारीची कबुली आरोपींनी दिली आहे.‘गिरगुटी’ हे गाव पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत येत असून, या विभागाने एका आरोपीला अटक केली. त्याची वनकोठडीही मिळविली. आज या आरोपीला अचलपूर न्यायालयापुढे हजर केले असता, तेथून त्याची रवानगी सेंट्रल जेल अमरावती येथे करण्यात आली.पूर्वमेळघाट वनविभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक प-हाड, वनपाल बारब्दे, हाते यांच्यासह वनाधिकारी व कर्मचा-यांनी मागील आठ दिवस सतत चौकशी चालविली. ही चौकशी गोपनीय ठेवण्यात आली. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. या चौकशीत दक्षता विभागाचे उपवनसंरक्षकांनीही आपला सहभाग दिला असून, हे सर्व अधिकारी घटनेचा उलगडा करण्यात मग्न आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात आलेल्या आरोपींना स्वत:च्या कस्टडीत घेऊन नव्याने पूर्वमेळघाट वनविभाग आपल्या स्तरावर स्वतंत्र चौकशी करणार असल्याचे सांगितल्या जात आहे.दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पानेही वाघासह अन्य वन्यजीवांच्या शिकारीच्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. व्याघ्र प्रकल्प अधिका-यांनीही त्या आरोपींची वनकोठडी घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे. या आरोपींची वनकोठडीही शनिवार-रविवारच्या दरम्यान संपणार होती. या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मागील १५ दिवसांपासून व्याघ्र प्रकल्प या चौकशीत गुंतलेला आहे. पण, चौकशीच्या अनुषंगाने कुठलीही माहिती देण्यास ते तयार नाहीत. चौकशी अधिका-यांच्या या गोपनीयतेमुळे मेळघाटातील वाघ आणि वन्यजीव मोठ्या प्रमाणात मारल्या गेल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान ‘लोकमत’ला प्राप्त माहितीनुसार या शिकारीच्या अनुषंगाने राष्टÑीय, आंतरराष्टÑीय तस्करी संदर्भातही चौकशी केल्या जात आहे. काही मोबाईल नंबरही चौकशी अधिका-यांच्या हाती लागले आहेत. पूर्वमेळघाट वनविभाग व व्याघ्र प्रकल्प या अधिका-यांनी या शिकार प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यातील आरोपींची कस्टडी न्यायालयाने वाढविली की, त्यांची जेलमध्ये रवानगी केली याविषयी मात्र माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती